spot_img
अहमदनगरमोहटादेवी यात्रोत्सव उत्साहात! दुसऱ्या दिवशी निघोज गटातील महिलांचा सहभाग

मोहटादेवी यात्रोत्सव उत्साहात! दुसऱ्या दिवशी निघोज गटातील महिलांचा सहभाग

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
खा. नीलेश लंके व राणीताई लंके यांच्या संकल्पनेतून व नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोहटादेवी यात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी महिलांच्या उत्साहाला उधाण आले होते. देवीचा जागर करत महिला या यात्रेत सहभागी झाल्या होत्या.

दुसऱ्या दिवशी निघोज व अळकुटी पंचायत समिती गण तसेच पारनेर शहरातील महिलांसाठी यात्रेचे नियोजन करण्यात आले होते. दोन्ही गट तसेच पारनेर शहरातून या यात्रेला मोठा प्रतिसाद लाभल्याने ऐनेवेळी बसेस कमी पडल्याने एस टी, स्कुल बसेस तसेच एमआयडीसीमधील बसेसची मदत घेण्यात येऊन सर्व महिलांना यात्रेत सहभागी करून घेण्यात आले. विविध मान्यवर तसेच राणीताई लंके यांनी उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्यानंतर हंगे येथून सर्व बसेस एकत्रीत मोहटादेवीकडे रवाना झाल्या.

यावेळी पारनेरचे नगराध्यक्ष नितीन अडसूळ, अर्जुन भालेकर, मा. उपनगराध्यक्षा सुरेखा भालेकर, डॉ. विद्या कावरे, योगेश मते, भुषण शेलार, निता औटी, सुप्रिया शिंदे, प्रियंका औटी, निता ठुबे, हिमानी नगरे, वैजयंता मते, विशाल शिंदे, शहराध्यक्ष बंडू गायकवाड, अमित जाधव, शोभा शेलार, सुदाम पवार, वसंत कवाद, बाळासाहेब खिलारी, ठकाराम लंके, संतोष काटे, बाळासाहेब पुंडे, अनिल आवारी, किरण पानमंद, बंटी दाते, प्रवीण साबळे, अरूण पवार, विश्‍वास शेटे, दत्ता येवले, गणेश मापारी, श्रीकांत डेरे, दत्ता म्हस्के, संतोष खाडे, सुनील गाडगे, भाऊसाहेब गाडगे, दिनेश चौगुले, किरण डेरे, शांताराम लाळगे, राहुल बाबर, युवराज कारखिले, सुनील बाबर, रेवन गाडीलकर, नुर कुरेशी, सचिन साखला, महेश पोखरणा, बाबाजी भंडारी, बाळासाहेब पोखरणा, महेश शिरोळे, सुभाष पुंडे, शरद घोलप, नीलेश घोलप, जालिंदर घोलप, साहेबराव बोरूडे, महादू भंडारी, भालचंद्र पुंडे, निखिल शिरोळे, दिनेश चौगुले, अनिल पावडे, मोतीराम येवले, नागेश लोणकर, शिवाजी उचाळे, महेश दाते, बंटी दाते, किरण पानमंद, सुदाम म्हस्के, बाळासाहेब गुजर, भाऊ गाडगे, पांडूरंग येवले, राजू शेंडकर, संदेश कापसे, संतोष कापसे, धोंडीभाऊ झिंजाड, अनिल चौधरी, गुलाब चौधरी, संदीप मुळे, नितिन मुळे, रमेश ढवळे, नारायण घोगरे, शंकर पुंड, किरण कारखिले, नवनाथ लाळगे, गोविंद लामखडे, राजू ढवळे, गणेश कवाद आदी उपस्थित होते.

भविष्यातही उपक्रम सुरूच राहणार
नवरात्रोत्सवात विशेषतः ग्रामीण भागातील माता माऊलींचा देवीचे दर्शन घडले पाहिजे हा संकल्प खा. नीलेश लंके यांनी केला होता. गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे. भविष्यातही हा उपक्रम सुरूच राहणार आहे. प्रतिष्ठाण तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेत आहेत.
राणीताई लंके ( मा. जिल्हा परिषद,सदस्या)

राणीताई महाविकास आघाडीच्या उमेदवार
गेल्या आठ वर्षांपासून खा. नीलेश लंके व राणीताई लंके हे मोहटादेवी यात्रेचे आयोजन करत आहेत. यंदाही त्यांनी महिलांसाठी ही पर्वणी उपलब्ध करून दिल्याबद्दल लंके दाम्पत्याला धन्यवाद. लवकरच विधानसभेची निवडणूक होणार असून महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून राणीताई लंके या निवडणूक लढविणार आहेत. सर्वांनी त्यांना मोठया मताधिक्क्याने विजयी करावे.
– ठकाराम लंके (मा. सरपंच, निघोज)

राणीताई आमदार होणार!
गेल्या आठ वर्षांपासूनचा मोहटादेवी दर्शन यात्रेचा प्रवास निश्‍चितच कौतुकास्पद आहे. खा. नीलेश लंके व राणीताई लंके यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. येणाऱ्या काळात राणीताई लंके यांच्या पाठीशी खंबिरपणे उभे राहायचे आहे. पारनेर तालुक्याच्या राणीताई लंके याचा आमदार होणार आहेत. त्यांच्या पाठीशी सर्वांनी तन, मन, धनाने उभे रहावे.
-अर्जुन भालेकर (जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस )

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विरोधकांना हलक्यात घेणे लंकेंना महागात पडले! बुक्का अन् वाजंत्री गँगने दाखवला हिसका

पारनेरकरांनी थोपविलं लंके यांचे प्रस्थापित होणं | सुजय विखेंचे सुदर्शन चक्र चालले | बुक्का...

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना‌’ यशस्वी अन्‌‍ आरक्षणाच्या फुग्याला टाचणी; महायुती 200 पार अन्‌‍ मविआचा..

फडणवीसांची जादू; ‌‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना‌’ यशस्वी अन्‌‍ आरक्षणाच्या फुग्याला टाचणी अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- फुले,...

अहिल्यानगरमध्ये महायुतीच! महाविकास आघाडीचं पानिपत

महाविकास आघाडीचं पानिपत | हेमंत ओगलेंनी वाचवली इज्जत | शरद पवारांसह ठाकरेसेनेला झिडकारले विजयी: भाजप...

अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीच; संगमनेर शहरातून निघणार विजयाची मिरवणूक

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगरच्या १२ मतदारसंघाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास...