अहिल्यानगर | नगर सह्याद्री
देशाचे नंदनवन असलेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी हल्ला करून केलेल्या हत्येचा जाहीर निषेध आहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) पक्षाच्या वतीने आ. संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सकाळी करून आतंकवाद्यांच्या प्रतिकात्मक पोस्टरला जोडे मारून त्याचे दहन करण्यात आले. आहील्यानगर मधील जुन्या बस स्थानक चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केले. मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद, बदला घ्या बदला घ्या हिंदूंवरील हल्ल्याचा बदला घ्या अशा जोरदार घोषणा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रा.माणिक विधाते, माजी नगरसेवक विशाल शेटिया, अजिंक्य बोरकर, प्रकाश भागानगरे, सुरेश बनसोडे, वैभव ढाकणे, गुड्डू खताळ, अजय दिघे, युवराज शिंदे, संजय मोरे, सागर गुंजाळ, संपत बेरड, मयूर कुलथे, ऋषिकेश ताठे, अमित खामकर, दीपक निपाणी, बाली बांगरे, सचिन पवार, साधना बोरुडे, अरविंद शिंदे, अभिजीत खोसे, संजय सपकाळ आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. प्रा. माणिक विधाते म्हणाले, काश्मीरमध्ये पहिल्यांदाच अतिरेक्यांनी धर्म विचारत हिंदूंची हत्या
केली आहे. हे अत्यंत घृणास्पद कृत्य अतिरेक्यांनी केले आहे. केंद्र सरकारने त्या अतिरेक्यांचा तातडीने शोध लाऊन त्यांना फाशीची शिक्षा द्यावी.सुरेश बनसोडे म्हणाले, काश्मीरमधील जिहादी वृत्तीच्या पथ विक्रेत्यांनी त्या अतिरेक्यांना हिंदु पर्यटकांवर हल्ला करण्यासाठी मोठी मदत केल्याचे आता उघड झाले आहे. त्यामुळे सर्व हिंदूंनी आता जागृत होऊन अशा जिहादी मुस्लीम विक्रेत्यांकडून कोणतीही वस्तू विकत न घेता त्यांच्यावर बहिष्कार घालावा, असे आवाहन केले.