spot_img
अहमदनगरआईनेचं पोटच्या गोळ्याला संपवल! अहिल्यानगर मधील मन सुन्न करणारी घटना...

आईनेचं पोटच्या गोळ्याला संपवल! अहिल्यानगर मधील मन सुन्न करणारी घटना…

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील खांडवी या गावांमध्ये स्वतःच्या एक वर्षाच्या मुलाला फाशी देऊन यानंतर आईने गळफास घेऊन आत्महत्या करण्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

याबाबत घडलेली घटना अशी की, कर्जत तालुक्यातील खांडवी येथे राहत असणाऱ्या साक्षी कुमार कांबळे यांनी त्यांच्या एक वर्षाचा मुलगा स्वरूप कांबळे यास गळफास देऊन त्यानंतर स्वतःची ही जीवन यात्रा संपवण्याची खळबळ जनक व दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे दोनच दिवसापूर्वी स्वरूप कांबळे याचा वाढदिवस झाला . यावेळी डीजे देखीलं लावण्यात आला होता आणि मोठ्या उत्साहात हा वाढदिवस साजरा करण्यात आला. मयत साक्षी व कुमार कांबळे यांचा प्रेम विवाह झालेला होता. आणि दोघेही आनंदाने राहत असताना अचानक राहते घरामध्ये साक्षी कांबळे या आईने राहते घरामध्ये पत्र्याच्या खाली असलेल्या लोखंडे अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

तत्पूर्वी तिने आपल्या एक वर्षाच्या मुलाला देखील गळफास देऊन मारले. याप्रकरणी मिरजगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील यांनी दिली. याघटनेचे कारण मात्र समजू शकले नाही. दरम्यान या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...