अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अखंड हिंदूस्थानातील अतिक्रमणधारण असलेल्या औरंगजेबच्या नावाने शेवटची आंघोळ झाली म्हणून, प्रचलित करण्यात आलेल्या नगर तालुक्यातील भिंगार भागात आलमगीर मध्ये अकारण कागदपत्रांची हेराफेरी करून अतिक्रमण करण्यात आले आहे. त्यावर तात्काळ कारवाई करून हे हटवण्यासाठी पावले उचलावी अशी मांगणी ज़िल्हाधीकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केली.
लवकरात लवकर कारवाई न केल्यास आम्ही आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्टाईलने यावर हातोडा चालवणार. कारण आमच्या छत्रपती संभाजी महाराजांना नरकयातना देऊन त्यांचा जीव घेतलेल्या कृर अश्या औरंग्याचे कोणतेही अवशेष हे कुणाला चांगला विचार देऊ शकत नाही कारण क्रूरता कधीच प्रेरणादायी असू शकत नाही. उलट या क्रूरतेला आदर्श मानून देशविरोधी कारवाया करताना अनेक औलादींच्या आत्तापर्यंत शासनाने मुसक्या आवळल्या आहेत. नगर जिल्ह्याचा हा कलंक लवकरात लवकर पुसला गेला नाही तर भविष्यात यांचे गंभीर परिणाम पुढे येतील आणि यावा जबाबदार प्रशासन राहील.
छत्रपती संभाजी महाराजांना हालहाल करून स्वराज्यावर अतिक्रमण करू इच्छित व्यक्तीचे विचार या अशा वेगवेगळ्या थडग्यातून जिवंत ठेवण्याचे काही कारण नाही. आपण तात्काळ याचा बंदोबस्त करावा अन्यथा महाराष्ट्र सैनिक तयारीत आहेतच कारण संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्र सैनिक या मोहिमेत सहभागी होतील ते प्रशासनाला परवडणारं नसेल, यावर विचार करून आपली भुमिका येत्या ८ दिवसांत स्पष्ट करा अन्यथा आमचा हातोडा चालणारच आहे यात शंका नाही. असा इशारा सुमित वर्मा यांनी ज़िल्हाधीकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केला