spot_img
अहमदनगर'अत्याचार्‍यांना नपुंसक करण्याचा कायदा करा'; निघोज ग्रामस्थांची मागणी

‘अत्याचार्‍यांना नपुंसक करण्याचा कायदा करा’; निघोज ग्रामस्थांची मागणी

spot_img

निघोज ग्रामस्थांची मागणी | बदलापूर घटनेचा जोरदार निषेध
निघोज | नगर सह्याद्री
लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपींना नपुंसक करण्याचा कायदा विधीमंडळ व संसदेत करण्याची निघोज ग्रामस्थांची मागणी केली. गुरुवार दि.२२ रोजी सकाळी दहा ते साडेअकरा वाजेपर्यंत निघोज एस टी बस स्थानक परिसरात रास्तारोको करुन निघोज ग्रामस्थांनी बदलापूर अत्याचार घटनेचा जोरदार निषेध केला. यावेळी पारनेर व शिरुरकडे जाणार्‍या शेकडो गाड्या थांबल्याने वाहतूक व्यवस्था पुर्णपणे कोलमडली होती. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीसांनी परिश्रम घेतले. निघोज ग्रामस्थ व आपली माती आपली माणसं या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रुपेश ढवण यांच्या वतीने आयजीत करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सुधामती कवाद, रामदास वरखडे, बाबाजी वाघमारे, अ‍ॅड बाळासाहेब लामखडे, रुपेश ढवण, महेंद्र पांढरकर, रोहिदास लामखडे, उत्तम लामखडे, शिवाजीराव लंके, योगेश वाव्हळ, सतिष साळवे, मनोहर एरंडे, छबू पाटोळे, तुकाराम सुपेकर, पोपट गुंड आदींनी आपल्या भावना व्यक्त करुण सरकार, पोलीस यंत्रणा तसेच बदलापूर येथील शाळा कमिटी यांचा निषेध करीत पोलिस यंत्रणा व सरकारने दाखवलेली दिरंगाई याबद्दल घटनेचा निषेध व्यक्त करीत या दुर्दैवी घटनेतील आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टात गुन्हा चालवून तातडीने फाशी देण्याची मागणी केली.

बदलापूर येथील या घटनेत शाळेच्या संस्था चालकांनी या निर्दयी कृत्य करणार्‍या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला म्हणजे एक प्रकारे या गुन्ह्याला पाठबळ दिले असून संस्थाचालकांना सहआरोपी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद मराठी शाळा, माध्यमिक विद्यालये तसेच उच्च माध्यमिक विद्यालये या ठिकाणी सातत्याने पोलिस बंदोबस्त ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

मुलिका देवी विद्यालय व महाविद्यालय हा परिसर पंचवीस एकर पेक्षा जास्त आहे. मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बागबगीचा असून निसर्ग रम्य परिसर असल्याने या ठिकाणी सातत्याने प्रिव्हिडींग फोटो सेशन व शुटींग सातत्याने सुरू असते यासाठी परवानगी कशी काय दिली जाते याबाबत चौकशी करण्याची गरज आहे. लग्न न झालेली जोडपी या ठिकाणी सातत्याने आढळत आहेत. यासाठी हा शाळेचा परिसर यासाठी कायमचा या लोकांना बंद करण्याची गरज असून शाळेच्या परिसरात पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली.

यावेळी कोलकता येथील डॉक्टर प्रकरणी घडलेल्या निंदनीय घटनेचा यावेळी निषेध केला. निघोज परिसर, शाळा, माध्यमिक विद्यालय महाविद्यालय या सर्व परिसरात सि सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात यावेत यासाठी सर्वतोपरी सहकार्य व्यापारी असोसिएशन करणार असल्याची ग्वाही देण्यात आली. यावेळी हेडकॉन्स्टेबल शिवाजीराव कडूस यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...