निघोज / नगर सह्याद्री –
मतदारसंघात दहशत निर्माण करुण विकासकामांचे खोटं नाट आश्वासन देऊन पारनेरच्या लोकप्रतिनिधी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना फसवीले या महाठगाला कायमचे घरी बसवीण्याची हीच संधी आहे. सुपा एमआयडीसीतील हप्ता पैसा बाहेर काढून तो स्वाभीमानी जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न करीत आहे मात्र आत्ता नाही तर कधीच नाही ही वेळ जनतेवर आणायची की नाही हे भवीतव्य वीस तारखेला ठरणार आहे. यासाठी काशिनाथ दाते हेच सक्षम उमेदवार असून पारनेर – नगर विधानसभा मतदारसंघातील जनतेने त्यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केले आहे.
पारनेर तालुक्यातील निघोज येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार काशिनाथ दाते यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रभाकर कवाद या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. विजूभाऊ औटी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोकराव सावंत, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, माजी अध्यक्ष वसंत चेडे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, डॉक्टर भाऊसाहेब खिलारी, शिवाजीराव खिलारी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मधुकर उचाळे, माजी सदस्य गणेश शेळके, जिल्हा परिषद माजी सदस्य राजाराम एरंडे, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, ॲड. बाळासाहेब लामखडे, रोहिदास लामखडे, राळेगण थेरपाळ सरपंच पंकज कारखीले, शिरापूर सरपंच भास्करराव उचाळे ,माजी सरपंच गणपतराव नरसाळे, सरपंच चित्राताई वराळ पाटील, उपसरपंच माऊली वरखडे, सुनिल थोरात, कापसे सर, भाजपच्या महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्ष सोनाली सालके, माजी उपसरपंच उमेश सोनवणे, सुधामती कवाद, विठ्ठलराव कवाद , पारनेर तालुका ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष मनोहर राउत, सांस्कृतिक सेलचे तालुकाध्यक्ष विलासराव हारदे, अमोल सालके, राजेश गोपाळे, सुमन कवाद, बॉबी गायखे, सुनंदा जाधव, विराज वराळ पाटील आदी उपस्थित होते. मळगंगा मंदीरात समोर झालेल्या या प्रचार सभेला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या माजी तालुकाध्यक्षा व ग्रामपंचायत सदस्या सुधामती कवाद यांनी अजित दादा पवार पक्षात प्रवेश केला. गेली पाच वर्षांपासून त्या खासदार नीलेश लंके यांच्या समर्थक म्हणून कार्यरत होत्या. मंत्री मुंढे यांनी यावेळी खासदार लंके यांच्यावर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी प्रवेश व लंके यांचे रडगाणे तसेच लंके यांची दादागिरी फक्त तोंडापुरती असून त्यांच्यात धमक नाही मात्र यावेळी त्यांना रोखण्यात अपयश आल्यास हे दादागीरीचे भूत मतदारसंघातील जनतेच्या कायमच्या मानगुटीवर बसेल आणी ते जनतेला परवडणारे नाही यासाठी काशिनाथ दाते यांना विजयी करा असे आवाहन मंत्री मुंढे यांनी केली. यावेळी मुंढे यांनी महायुतीने राबवलेल्या विविध योजनांची माहिती देताना या योजनांवर प्रतिबंध आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महाविकास आघाडीची खिल्ली उडवली. विजूभाऊ औटी यांच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता भक्कमपणे उभे राहण्यासाठी आपण सर्वतोपरी पाठबळ देणार असून कार्यकर्ते तसेच सर्वसामान्य जनतेला दादागिरी करणऱ्या विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. विजूभाउ औटी यांनी विरोधी उमेदवाराने केलेल्या दादागीरीची माहिती सांगत आपल्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी दाते सर पाठींबा देण्यासाठी सुचना केली व त्यांचा आदेश शिरसावंद्य मानून आपण त्यांना पाठिंबा दिला असून तालुक्यातील जनता सुरक्षित राहण्यासाठी दाते सर यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा असे आवाहन औटी यांनी केले. संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांनी विरोधी उमेदवारावर जोरदार टिका केली . खासदारकीला जी चूक जनतेने केली आहे ती न करता हुकुमशाहीचा पाडाव कायमचा करण्यासाठी दाते सर यांना मतदान करण्याचे आवाहन वराळ पाटील यांनी केले आहे. राज्य भाजप कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी भाजप व युतीच्या सरकारने केलेल्या कामांचा आढावा घेत महायुतीचे उमेदवार म्हणून दाते सर योग्य असून त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. पारनेर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक ॲड बाळासाहेब लामखडे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले शेवटी रोहिदास लामखडे यांनी आभार मानले.
विजय निश्चित : दाते
आपल्याला गेली चाळीस वर्षाचा मोठा अनुभव असून जिल्हा परिषद माध्यमातून सभापती पदाचा फायदा मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यासाठी झाला असून कामांचा पाठपुरावा व विकासकामे करण्यासाठी आपण तप्तर असून जनतेचा मोठ्या प्रमाणात विश्वास आपल्यावर आहे. गेली पाच वर्षात लोकप्रतिनिधींनी काय केले याची माहिती जनतेला आहे गटातटाचे राजकारण करीत त्यांनी गावागावात भांडणे लावण्याचे काम केले आहे. आपल्यावर पक्षश्रेष्ठींनी विश्वास टाकला आहे. जिल्हा तसेच राज्यातील महत्वपूर्ण संस्था, संघटना यांनी आपल्याला पाठींबा दिला असून आपला विजय विक्रमी मताधिक्य मिळवून होणार असल्याचा विश्वास उमेदवार काशिनाथ दाते यांनी व्यक्त केला आहे.