spot_img
अहमदनगर'पारनेरच्या आठवडे बाजारात चिखलाचे साम्राज्य'

‘पारनेरच्या आठवडे बाजारात चिखलाचे साम्राज्य’

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
पारनेर शहरात दोन तिन दिवसां पासून रिमझिम पाऊस पडत असल्याने पारनेर शहरातील आठवडी बाजारात चिखल व घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने ग्राहक व विक्रेते कमालीचे त्रस्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे.त्यामूळे नागरिकांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या पावसाळा असल्याने साथीच्या आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे पारनेर नगर पंचायत संभदित प्रशासन व स्वच्छता विभागाने बाजारातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याची मागणी शहरातील नागरिक करत आहे.

दर रविवारी पारनेर शहरातील आठवडी बाजार भरला जातो.परिसरातील बारा तेरा वाड्या व वस्त्या वरील शेकडो नागरिक भाजीपाला खरेदी व विक्री करण्यासाठी या आठवडी बाजारात येत असतात.बाजारात आलेल्या ग्राहकांना या चिखलाचा सामना करावा लागतो.नागरीकांच्या या समस्या बाबत पारनेर नगर पंचायत अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.नगर पंचायत प्रशासना कडून बाजारा मध्ये भाजीपाला विक्री साठी आणलेल्या मालावर कर वसूल केला जातो पण त्यांना बाजारातली प्राथमिक नागरी सुविधा देण्यास नगर पंचायत प्रशासन असमर्थ ठरत आहे. पारनेर नगर पंचायत स्वच्छता विभागाने व सत्ताधारी पक्षाच्या नगराध्यक्ष व पदाधिकारी यांनी तात्काळ दखल घेउन बाजारातली चिखल समास्या दुर करण्यासाठी संपूर्ण बाजारातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याची मागणी शहरातील नागरिक करत आहेत.

चौकट :
आठवडी बाजारातील चिखल समस्या सोडवावी व भाजीपाला विक्रेते यांना कायमस्वरूपी पिण्याचे पाण्याची सोय करण्यात यावी.
किरण सोनवणे
– तालुकाध्यक्ष (आरपीआय (आंबेडकर गट) पारनेर)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...