spot_img
अहमदनगरउत्तरेत मताधिक्क्यावर भर; दक्षिणेत ‘काँटे की टक्कर’, कोणाचा गुलाल फिक्स..

उत्तरेत मताधिक्क्यावर भर; दक्षिणेत ‘काँटे की टक्कर’, कोणाचा गुलाल फिक्स..

spot_img

संगमनेर, शिर्डी, कोपरगावच्या निकालाची उत्सुकता | नगर, पारनेर, श्रीगोंदा, राहुरी, शेवगाव-पाथर्डी, कर्जत-जामखेडमध्ये चुरस

अहिल्यानगर | नगर सह्याद्री- 
महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवार २० नोव्हेंबर रोजी राज्यात सर्वत्र मतदान झाले. अहिल्यानगर जिल्ह्यातही ते झाले. अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण १२ विधानसभा मतदारसंघ असून यावेळी १५१ उमेदवार रिंगणात आहेत. यावेळी ही निवडणूक थोड्या वेगळ्या वातावरणात झाली असून त्यामुळे मतदारांत सकाळपासूनच मतदान करण्यासाठी उत्साह दिसून आला. लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या वेळी उन्हाळा असल्याने मतदानाची टक्केवारी घसरली; परंतु आता हिवाळ्याचे दिवस असल्याने ती थोडी वाढलेली दिसली.
जिल्ह्यात दुपारी एक वाजेपर्यंत सरासरी ३२.९० टक्क्यांच्यावर मतदान झाले. जिल्ह्यात नगर शहर, कर्जत-जामखेड, पारनेर-नगर, नगर-राहुरी, पाथर्डी, श्रीगोंदा मतदारसंघांतील लढती लक्षवेधी ठरल्या आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण व नगर उत्तर या दोन्ही मतदारसंघांत युतीचे उमेदवार निवडून आले; परंतु उद्धव ठाकरे यांंनी भाजपशी फारकत घेतल्याने २०२४ च्या निवडणुकीत या दोन्ही ठिकाणी युतीचा बोजवारा उडाला.

या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुका होत असून महायुतीतर्फे लोकसभेचा वचपा काढण्यासाठी जीव तोडून प्रचार करण्यात आला. नगर दक्षिणचे खासदर नीलेश लंके यांनी जिल्ह्यातील १२ ही आमदार महाविकास आघाडीचेच आणू असा चंग बांधला असला तर एकूण वातावरण पाहता ते शक्य दिसत नाही. तरीही लढती मात्र चुरशीच्या होत आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजपचे प्रा. राम शिंदे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार रोहित पवार यांना धोबीपछाड देऊ असे म्हणत असल्याने येथील निवडणूकही लक्षवेधी ठरणार आहे. नगर-राहुरी-पाथर्डी मतदारसंघात माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले मागील विधानसभेच्या पराभवाचा बदला घेण्याच्या तयारीत आहेत.

नगर-पारनेर मतदारसंघात खासदार नीलेश लंके यांनी आपल्या सौभाग्यवती सौ. राणी लंके यांनी मैदानात उतरविल्याने या निवडणुकीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. श्रीगोंदा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी आपले चिरंजीव विक्रमसिंह पाचपुते यांना मैदानात उतरविले आहे. तरीही येथील तिरंगी लढत लक्षवेधी ठरणार आहे. नगर शहर मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यामान आमदार संग्राम जगताप आणि माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचे पुतणे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर यांच्यातच चुरशीची लढत आहे. यावेळी मतदारांत उत्साह दिसून आल्याने व मतदान टक्केवारी वाढल्याने येत्या २३ रोजीच्या निकालात काय चित्र दिसेल याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

जगताप-कळमकर यांच्यात चुरस
नगर शहर मतदारसंघातही उत्साहात मतदान पार पडले. सकाळपासूनच काही मतदान केंद्रावर नागरिकांचा मतदान करण्यासाठी उत्साह दिसून आला. नगर शहर मतदारसंघात महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर या शिवाय हनीफ शेख, गणेश कळमकर, किरण काळे, मंगल भुजबळ, सचिन राठोड, शिवाजीराव डमाळे, उमाशंकर यादव, सुनील फुलसौंदर हे उमेदवार रिंगणात आहेत. पण खरी लढत महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर यांच्यातच होती. नगर शहर मतदारसंघात १९९० पासून २०१९ च्या निवडणुकीतपर्यंत धनुष्यबाण चिन्ह होते. यंदा प्रथमच धनुष्यबाणविना ही निवडणूक होत आहे. शहरातील बहुतांश मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. त्यामुळे त्याचा परिणाम काय होतो याकडे आता सार्‍यांचे लक्ष आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महानगरपालिकेचे जनजागृती अभियान यशस्वी; अहिल्यानगर शहराचा मतदानाचा टक्का वाढला

आदर्श मतदान केंद्राची उभारणी; मतदारांसाठी उपलब्ध केलेल्या सुविधांमुळे मतदारांकडून समाधान व्यक्त अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर...

राज्यात 65.11 टक्के तर नगर जिल्ह्यात 71.73 टक्के मतदान

30 वर्षांमधील सर्वाधिक प्रतिसाद, कोल्हापूर जिल्हा हा सर्वात जागरुक, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात निरुत्साह मुंबई । नगर...

उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर गुन्हा दाखल; नेमकं कारण काय?

Gautam Adani News भारतातील मोठे उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेतली एका कंपनीने गुंतवणुकदारांची फसवणूक...

महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? कुणाला किती जागा मिळणार? पहा, एक्झिट पोल..

Exit Polls: गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया...