spot_img
अहमदनगरअहिल्यानगर जिल्ह्यातील 'या' तीन जागांवरून महायुतीत पेच?, घोडं नेमकं कुठे अडलं? वाचा...

अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ तीन जागांवरून महायुतीत पेच?, घोडं नेमकं कुठे अडलं? वाचा सविस्तर

spot_img

अहिल्यानगर। नगर सहयाद्री:
महायुतीनं जागा वाटपात आघाडी घेतली असली तरीही अनेक जागांवर अजूनही पेच कायम आहे. जवळपास डझनभर जागांवर अजूनही महायुतीत एकमत झालेलं नाही. या जागा मिळवण्यासाठी महायुतीमध्ये धुमश्चक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे. अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस असताना महायुतीत कोणत्या जागांवर पेच कायम आहे?

विधानसभा निवडणुकीत लोकसभेसारखा घोळ न करता यावेळी महायुतीनं जागावाटपांमध्ये आघाडी घेतली. मात्र जागावाटपाबाबत अंतर्गत धुसफूस समोर आली. दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील तिन जागांवर महायुतीत पेच निर्माण झालेला दिसून येतो. त्यामुळे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते अस्वस्थ आहेत.

महाविकास आघाडीने बारा मतदारसंघात उमेदवार निश्चित केले आहे,मात्र महायुतीचे मात्र तीन जागांवर निर्णय होताना दिसत नाही. संगमनेर, श्रीरामपूर आणि नेवासा या जागांचा निर्णय महायुतीत प्रलंबित आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अहिल्यानगर जिल्ह्यातील एकाही जागावेर उमेदवार जाहीर केलेला नाही. तसेच सध्या संगमनेर विधानसभा मतदारसंघात चर्चत आहे. ही जागा महायुतीमध्ये कोणाकडे जाते याची उत्सुकता आहे.

संगमनेर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून माजी खासदार सुजय विखे इच्छुक आहेत. नेवासा मतदारसंघासाठी भाजपकडील इच्छुक माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांची नावं पाठवण्यात आली आहे. या जागेवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उद्योजक प्रभाकर शिंदे इच्छुक आहेत. त्यामुळे इथला निर्णय प्रलंबित आहे.

श्रीरामपूर मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे जाईल हे जवळपास निश्चित झालं आहे. भाजपचे नितीन दिनकर शिवसेनेच्या धनुष्यबाणावर उमेदवारी देण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. परंतु तिथं काँग्रेसकडून उमेदवारी नाकारलेले आमदार लहू कानडे आणि माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी देखील धनुष्यबाणासाठी मुंबईत फिल्डिंग लावली आहे. त्यामुळे श्रीरामपूरचा निर्णय महायुतीत काय होतो, याची उत्सुकता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आमदार सत्यजित तांबे यांची मोठी मागणी; वकीलबांधवांसाठी ‘तो’ कायदा लागू करा

Satyajit Tambe: नाशिक जिल्ह्यातील माडसांगवी येथे ॲड. रामेश्वर बोऱ्हाडे यांच्यावर नुकताच प्राणघातक हल्ला झाला....

शहर हादरलं! सरफिऱ्या पतीचे धक्कादायक कृत्य, चार्जरच्या वायरने पत्नीचा गळा आवळला..

Maharashtra Crime News: कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. चार्जिंगच्या वायरने नवऱ्याने...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींसाठी ‘मंगळवार’ कसा? पहा..

मुंबई । नगर सह्याद्री –  मेष राशी भविष्य दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते...

श्रीगोंद्यात गुन्हेगारीचा कहर! महिलेच्या डोक्याला लावली पिस्तुल, पुढे घडलं असं काही..

श्रीगोंदा | नगर सह्याद्री तालुक्यातील वडाची वाडी येथे कोर्टातील दाव्याच्या कारणावरून एका महिलेस पिस्तुलाचा...