अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
शहरातील माळीवाडा परिसरातील हॉटेल अभिषेक, ब्राम्हण गल्ली, बारातोटी कारंजा, माळीवाडा येथे वीजचोरीप्रकरणी राजेंद्र हिरालाल राजपुत (वय 55, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, रा. ठाकरेनगर, सिडको, छत्रपती संभाजीनगर) यांच्या फिर्यादीवरून श्रीमती चैताली बाळासाहेब बोराटे (रा. हॉटेल अभिषेक, माळीवाडा, अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
07 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास चैताली बोराटे यांनी त्यांच्या वीज ग्राहक क्रमांक 162010712491 च्या मीटरमध्ये फेरफार करून गेल्या 12 महिन्यांपासून 5 हजार 279 युनिट्सची वीज चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. या चोरीमुळे 1 लाख 23 हजार 188 रुपयांचे नुकसान झाले असून तडजोड रक्कम 70 हजार रुपये ठरविण्यात आली आहे.
फिर्यादी राजेंद्र राजपुत यांनी कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविल्यानंतर, भारतीय विद्युत कायदा 2003 चे कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांनी घटनास्थळाला भेट दिली. वीजचोरी रोखण्यासाठी महावितरण आणि पोलिसांची संयुक्त कारवाई सुरु आहे. पुढील तपास कोतवाली पोलिस करत आहेत.