spot_img
महाराष्ट्रवीज चोरी भोवली; तिघांवर गुन्हा दाखल

वीज चोरी भोवली; तिघांवर गुन्हा दाखल

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
भिंगार हद्दीत वीज वितरण कंपनीच्या परवानगीशिवाय थेट वीज वापरून अनधिकृत वीज चोरी करणाऱ्या तिन वेगवेगळ्या व्यक्तींवर भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 अंतर्गत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

महावितरण कंपनीच्या स्टेशन रस्ता, अहिल्यानगर कार्यालयातील अति. कार्यकारी अभियंता हरीचंद्र पोपळघट यांनी शनिवारी (26 एप्रिल) फिर्यादी दाखल केल्या आहेत. आलमगीर, भिंगार येथील राहिवासी मुबारक खलील पठाण याने त्याच्या राहत्या घरावर आणि दुकानावर महावितरणच्या लघुदाब वीजवाहक तारेवर वायरने थेट वीज जोडणी करून सुमारे 99 युनीट वीज चोरी केली.

या वीज चोरीची भरपाई रक्कम 20, 640 इतकी आहे. तसेच आलमगीर येथीलच शहाबाज ईजाज ईनामदार याने वायरचा वापर करून दुसऱ्या ठिकाणी कायमस्वरूपी वीज जोडणी केली व एकूण 299 युनिट वीज चोरी करून 25 हजार 240 रकमेची नुकसान भरपाई थकवली आहे.तर बाराबाभळी (ता. अहिल्यानगर) येथील बांधकाम साईटवर वीज चोरी करताना संदेश गोपाळराव झोडगे आढळला. त्यानेही वायरने थेट वीजवाहक तारेवरून वीज जोडली होती. एकूण 655 युनिट वीज चोरी झाली असून याची तडजोड रक्कम 32 हजार 432 इतकी आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य ! ‘या’ राशीतील जातकांना लाभदायक ‘गुरुवार’

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य खूप अल्पसे अडथळे येतील-परंतु दिवसभरात खूप काही यश...

नगर शहरातील तीन समाजकंटक हद्दपार; वाचा नगर क्राईम

​अहिल्यानगर । नगर सह्याद्री ​अहिल्यानगर शहरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कोतवाली...

जिल्हा बँक सोनेतारण व्यवसाय वाढवणार : चेअरमन चंद्रशेखर घुले

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोनेतारण व्यवसायात वाढ करणार...

सामूहिक आत्महत्येने नाशिक हादरले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने २ मुलांसह विहिरीत मारली उडी

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह सामूहिक आत्महत्या केल्याची घटना...