spot_img
अहमदनगरनिवडणुका येतील आणि 'ते' विकासाच्या गप्पा मारतील; आ. जगताप यांनी साधला विरोधकांवर...

निवडणुका येतील आणि ‘ते’ विकासाच्या गप्पा मारतील; आ. जगताप यांनी साधला विरोधकांवर निशाणा

spot_img

बुरुडगाव येथे काँक्रिटीकरण रस्त्याचा लोकार्पण सोहळा
अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
शहरातील काही स्वयंघोषित पुढारी राजकारणाकडे करिअर म्हणून पाहत असतात मात्र आम्ही विकासात्मक कामातून सेवा म्हणून पाहत आहोत, शहराचे वैभव कसे वाढेल यासाठी आम्ही सर्व विषयावर काम करत आहोत आता महापालिकेच्या निवडणुका येतील त्यावेळी नवीन लोक विकासाच्या गप्पा मारतील मात्र निवडणुका संपल्या की गायब होतील आम्ही मात्र निवडणुकीपुरते काम करत नसून पाचही वर्ष जनतेत राहून विकासाचे कामे माग लावत असतो, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

बुरुडगाव येथील स्वाती कॉलनीत माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या पाठपुराव्यातून आणिआमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रिटीकरणकामाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला, यावेळी माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, बाळासाहेब वाघ, संजय भंडारे, पत्रकार शिल्पा रसाळ, निखिल रसाळ, माया धोका आधीच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार संग्राम जगताप बोलत होते.

आ. जगताप म्हणाले, शहराची ओळख ही दोन वेशीच्या आतली होती, गेल्या दहा-बारा वर्षापासून शहराचा विस्तार कसा वाढवता येईल याकडे नियोजन करीत लक्ष दिले, नागरिकांना विकासाच्या मूलभूत सुविधांपासूनची सर्व कामे माग लावली, त्यामुळे नागरी वसाहती झपाट्याने वाढत शहराच्या चारही बाजूला नवीन उपनगरे तयार झाली, बुरुडगाव रोड परिसराची विकसित व सुरक्षित उपनगर म्हणून ओळख निर्माण झाली.

त्यामुळे शहरातील नागरिक या भागामध्ये राहण्यासाठी पसंती देत असल्याचे मत व्यक्त केले. आमदार संग्राम जगताप बालपणी चाणक्य चौकात राहत होते. त्यावेळी ते आमच्या स्वाती कॉलनीमध्ये खेळण्यासाठी यायचे असते, आपल्या शहराचे तिसऱ्यांदा आमदार झाले याची आम्हाला कौतुक आहे, त्यांच्या हातून नगर शहराचा विकास कामातून कायापालट होत असल्याचे ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब वाघ यांनी सांगितले.

आ. संग्राम जगताप यांच्यामुळे नागरिकांचे प्रश्न माग
आमदार संग्राम जगताप यांनी शहर विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असल्यामुळे नागरिकांचे प्रश्न जलद गतीने माग लागत आहे, त्यामुळे नागरिकही समाधान व्यक्त करत आहे, स्वाती कॉलनीतील नागरिकांनी माझ्याकडे रस्त्याचे काम माग लागावे यासाठी पाठपुरावा केला मी ते काम आ. संग्राम जगताप यांना सांगितले व ते तातडीने माग लागले. यामुळे नागरिकांचे समाधान होत आहे.
– गणेश भोसले, माजी उपमहापौर

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक! प्रियकराच्या घराबाहेर तृतीयपंथीयाची आत्महत्या

पुणे । नगर सहयाद्री:- पुण्यातील तृतीयपंथीयाला जयपूरचा तरूण आवडला. दोघांमधले प्रेम बहरले. ते दोघेही...

नैतिकता : धनुभाऊंना नाहीच; अजितदादा तुम्हाला? धनंजय मुंडेंना किती दिवस पोसणार?, चमच्यांमुळेच बीडची वाट लागली!

खंडणीखोर मुकादम, बेभान कार्यकर्ते, सत्तेचा माज असणारे नेते अन्‌‍ टुकार चमच्यांमुळेच बीडची वाट लागली!सारिपाट...

ट्रक दरीत कोसळून 10 जण ठार; कुठे घडला भयंकर अपघात!

नवी दिल्ली | नगर सह्याद्री:- कर्नाटकमध्ये बुधवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एक...

महाराष्ट्राच्या हाती मोठं घबाड! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यात काय-काय घडलं?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतल्या अनेक कंपन्यांच्या भेटी; सव्वासहा लाख कोटींवर गुंतवणूक करार मुंबई | नगर...