spot_img
ब्रेकिंगआल्या निवडणूका!! मतदार यादीत तुमचं नाव आहे का? तपासा एका क्लिकवर

आल्या निवडणूका!! मतदार यादीत तुमचं नाव आहे का? तपासा एका क्लिकवर

spot_img

नगर सहयाद्री टीम-
राज्यात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणुकांच्या वेळी मतदार हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. मतदारांनी दिलेल्या मतांवर प्रतिनिधी ठरत असतो. त्यामुळे प्रत्येकाने मतदानापूर्वी मतदार यादीत तुमचं नाव आहे का हे तपासलं पाहिजे.

तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला भटकण्याची गरज नाही. ही माहिती तुम्ही ऑनलाइन किंवा एसएमएसद्वारेही मिळवू शकते. मतदार यादीत तुमचे नाव आहे का? जाणून घ्या

राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल
तुम्ही नॅशनल व्होटर्स सर्व्हिस पोर्टलद्वारे ऑनलाइन मतदार यादीतील नाव शोधू शकता.
राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (NVSP) च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
वेबसाइट उघडल्यावर, उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला इंग्रजी किंवा हिंदीमधून तुमची भाषा निवडा.
आता मतदार यादीत शोधा वर क्लिक करा.
तुम्हाला 3 पर्याय दिसतील – EPIC द्वारे शोधा, तपशीलांनुसार शोधा, मोबाइलद्वारे शोधा.
यापैकी कोणत्याही एकावर जा, तुमचा तपशील भरा, कॅप्चा टाका आणि तुम्हाला मतदार यादीचा तपशील मिळेल.

मतदार यादीतील नाव तपासा एसएमएसद्वारे
एसएमएसच्या मदतीने मतदार यादीत नाव पाहता येईल. यासाठी, तुम्हाला नोंदणी क्रमांकाची आवश्यकता असेल, जो तुम्हाला मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करताना मिळाला असेल. यासाठी 10 अंकी EPIC क्रमांक आवश्यक असेल. तुम्हाला EPIC Voter ID क्रमांक टाइप करून 1950 वर एसएमएस पाठवावा लागेल.

हेल्पलाइन नंबर मतदार यादीतील नाव तपासा
मतदार यादीतील नाव पाहण्यासाठी निवडणूक आयोगाच्या टोल फ्री क्रमांकावर डायल करूनही माहिती मिळू शकते. यासाठी 1950 हा नंबर डायल करा. यानंतर, IVR (इंटरएक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स) ऐका आणि सूचनांचे पालन करा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाषा निवडा आणि पुढील पायऱ्या पूर्ण करा. तुम्हाला संदर्भ क्रमांक टाकावा लागेल, त्यानंतर तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे कळेल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नडणाऱ्यांसह काँग्रेस अन्‌‍ ठाकरे सेना क्लीन बोल्ड

महानगरपालिकेत डॉ. सुजय विखे पाटील -आमदार संग्राम जगताप एक्सप्रेेस निर्णायक ठरणार! सारिपाट / शिवाजी शिर्के प्रभाग...

वनविभागाच्या हलगर्जीपणामुळेच तरुणाचा बळी!, कळस येथील घटनेला जबाबदार कोण?

पिंजरा लावण्याची जबाबदारी का झटकली? गणेश जगदाळे। पारनेर पारनेर तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या जुन्नर तालुका राज्यात बिबट्या...

जिल्ह्यात लेझर लाईट, दबाव हॉर्न व कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर बंदी

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) नुसार...

मैदान ठरलं; तोडफोडीमुळे ‘अशी’ राजकीय गणिते बदलली!, आता आरक्षणाकडे नजरा..

सुनिल चोभे | नगर सह्याद्री अहिल्यानगर महापालिका निवडणुकीची उलटगणती सुरु झाली असून निवडणुकीचा राजकीय रंग...