spot_img
अहमदनगरझेडपी, पंचायत समितीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, वाचा महत्वाची अपडेट

झेडपी, पंचायत समितीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, वाचा महत्वाची अपडेट

spot_img

मुंबई/अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगरसह राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना, झेडपी अध्यक्ष आरक्षण आणि पं. स. समिती सभापती आरक्षणानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार अंतिम आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 27 ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाईल. गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व 14 पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रतिक्षा आहे.

दरम्यान, आधी गट आणि गणाची सुधारित प्रभाग रचना त्यानंतर अध्यक्ष पदाचे आणि पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहेत. या विरोधात न्यायालयीन लढाईनंतर राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला आहे. यामुळे रखडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या दृष्टीने हे पहिले पाऊल मानले जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीसाठी 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे.

त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे. जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याचा निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्यांचा अंतिम व अधिप्रमाणित करून मतदार याद्या व मतदान केंद्र यांची यादी प्रसिध्द करणार आहेत. त्यानंतर साधारण लवकरच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर होवून निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली.

मतदारयादीचा कार्यक्रम
* अधिसूचित दिनांक : 1 जुलै 2025
* यादी प्रसिद्धी : 8 ऑक्टोबर 2025
* हरकती मुदत : 14 ऑक्टोबरपर्यंत
* अंतिम प्रसिद्धी : 27 ऑक्टोबर

राजकीय हालचाली वाढल्या
सर्वोच्य न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने राज्यासह गट व गणांतील राजकीय नेत्यांच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासूनच इच्छुकांनी मतदारांच्या भेटी गाठी सुरु केल्या असून जोरदार तयारी सुरु केली आहे. वरिष्ठ पातळीवरुन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुती व महाविकास आघाडी करण्याचे सुतोवाच केले असल्याने त्या अनुषंगाने नेत्यांनीही संभाव्य उमेदवार लक्षात घेऊन तयारी चालविली आहे. दरम्यान, गट-गणांची अंतिम रचना झाली असली तरी गट गणांतील आरक्षण अद्याप जाहीर झालेले नसल्याने इच्छुकांनीही वेट ॲण्ड वॉचची भूमिका घेतली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आदिवासी मोर्चाला हिंसक वळण; आंदोलनात दगडफेक,वाहनांची तोडफोड

नंदूरबार / नगर सह्याद्री - नंदूरबारमधील आदिवासींच्या मोर्चाला हिंसक वळण लागलं. आंदोलनात दगडफेक झाल्यानंतर...

शिर्डी साई संस्थान समितीच्या नियुक्तीला स्थगिती

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शिर्डी साई संस्थान समितीप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिला असून...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पारनेर दौऱ्याला विरोध; भूमिपुत्र संघटना व पारनेर कारखाना बचाव समिती आक्रमक

पारनेर | नगर सह्याद्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दि. 2 ऑक्टोबरला दसरा मेळाव्याचे...

पारनेर तालुक्यात ‘आर्थिक’ सुनामीची लाट; ‘या’ पतसंस्थेत 81 कोटींचा अपहार

पारनेर | नगर सह्याद्री कान्हूर पठार (ता. पारनेर) येथील राजे शिवाजी सहकारी पतसंस्थेत तब्बल 81...