spot_img
महाराष्ट्रदिवाळीनंतर फुटणार निवडणुकांचे फटाके; असे आहे नियोजन...पण..

दिवाळीनंतर फुटणार निवडणुकांचे फटाके; असे आहे नियोजन…पण..

spot_img

निवडणुकीची प्रक्रिया तीन टप्प्यांत | नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका

मुंबई | नगर सह्याद्री

राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बार फुटणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया ३ टप्प्यामध्ये पार पाडण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे नियोजन आहे. सध्या राज्यातील सर्वच राजकीय पक्षांकडून आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते त्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. दरम्यान, अहिल्यानगरमध्येही आरोप-प्रत्यारोपांचा राजकीय धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शयता आहे. डिसेंबरमध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शयता आहे. जानेवारीमध्ये मुंबईसह राज्यातील सर्व महानगर पालिकेचा निवडणूक होण्याची शयता वर्तवली जात आहे.महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्या आहेत.

या निवडणुकांबाबत नुकताच सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला. सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला खडसावत निवडणुका घेण्यासाठी ३१ जानेवारी २०२६ पर्यंताचा वेळ दिला आहे. ३१ जानेवारीपूर्वी  निवडणुका घेण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. याआधी सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला नोव्हेंबर अखेरपर्यंतचा वेळ दिला होता. पण सरकारने कोर्टात धाव घेत मुदत वाढवण्याची मागणी केली होती. कोर्टाने त्यांची मागणी मान्य करत ३१ जानेवारीपर्यंतचा वेळ दिला आहे. आता राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाकडून निवडणुका कधी आणि कशा घ्यायच्या याचे नियोजन केले जात आहे. येत्या काही दिवसांमध्ये निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करतील.

महायुती, महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी
विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीमध्ये सामना पहावयास मिळाला. या निवडुकीत महाविकास आघाडीने सपाटून मार खाल्ला. केवळ ५० जागाही जिंकता आल्या नाही. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपल्याच पक्षाची सत्ता आणण्यासाठी स्थानिक पातळीवर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. दरम्यान, राज्यातील नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्येही महायुती व महाविकास आघाडी एकत्रित लढणार असल्याचे यापूर्वीच सांगितले आहे. त्यादृष्टीने तयारीही चालविली आहे. मुंबई महापालिकेसाठी शिवसेना (ठाकरे गट) व मनसे यांच्यात युती होण्याची शक्यता आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मार्केटयार्डमध्ये भीषण आग; लाखोंचे साहित्य जाळून खाक

दीड लाखांचे नुकसान, वर्षानुवर्षांची बिले जळून खाक! अहिल्यानगर / नगर सह्याद्री - मार्केटयार्डमधील जयप्रकाश कस्तुरचंद कटारिया...

लाडक्या बहि‍णींवर सरकारचा लेटरबॉम्ब! ‘या’ महिलांनाच मिळणार दीड हजार

मुंबई / नगर सह्याद्री - 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतील सर्व लाभार्थींना ईकेव्हायसी बंधनकारक करण्यात...

नगरमध्ये जात प्रमाणपत्रासाठी १८ हजार रुपयांची लाच; ‘ती’ महिला जाळ्यात

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - शहरातील जात पडताळणी प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या मोबदल्यात एका खाजगी महिलेच्या...

चारित्र्याच्या संशयावरुन विवाहितेला धमक्या; हुंडा, अत्याचार, कुठे कुठे काय काय घडलं पहा

विवाहितेची पती-सासरच्यांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा अहिल्यानगर / नगर सह्याद्री - लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच...