spot_img
ब्रेकिंगनिवडणूकीचा प्रचारात राडा! काँग्रेस नेत्याचा भयंकर प्रताप; भाजपचा प्रचार करणाऱ्या...

निवडणूकीचा प्रचारात राडा! काँग्रेस नेत्याचा भयंकर प्रताप; भाजपचा प्रचार करणाऱ्या…

spot_img

Political News: नागपूरमध्ये कळमेश्वर निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसचे माजी नगरसेवक हरीश ग्वालबंशी यांना आरिफ शेख यांच्यावर अपहरण व मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे स्थानिक राजकारणात तणाव निर्माण झाला आहे. निवडणूक प्रचारात राडा आणि हाणामारी केल्याच्या आरोपाखाली नागपूरमध्ये काँग्रेसच्या नेत्याला पोलिसांनी अटक केली आहे.

कळमेश्वर नगर परिषदेच्या निवडणूक प्रचारावेळी झालेल्या वादावरुन मारहाण प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या नेत्याचे नाव हरिश ग्वालबंशी यांना अटक करण्यात आली आहे. ते नागपूर काँग्रेसचे माजी नगरसेवक आहेत. हरिश ग्वालबंशी यांना अटक केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहेत. या प्रकररणामुळे कळमेश्वर नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण तापले आहे.

आरिफ नावाच्या एका व्यक्तीला काँग्रेसचे नागपुरातील माजी नगरसेवक हरीश ग्वालबंशी आणि त्यांच्या पाच ते सहा सहकार्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यांच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी कारवाई करत बेड्या ठोकल्या. पोलीसांनी हरीश ग्वालबंशी, आशू ग्वालबंशी यांच्यासह इतर काही आरोपींना अटक केली. पोलिसांकडून आरोपींची चौकशी करण्यात येत आहे. आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

आरीफ लतीफ शेख यांना अपहरण आणि मारहाण प्रकरणात पोलिसांनी मंगळवारी कारवाई केली. तू काँग्रेसाठी काम का करत नाही, भाजपला का पाठिंबा देतो? म्हणत आरीफ याला काँग्रेस नेत्यांकडून मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत आरीफ जखमी झाला होता. त्याच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. आरीफ यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. आरीफ याला मारहाण झाल्यानंतर स्थानिक भाजप नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.

रविवारी रात्री आरिफ याला आशिष ग्वालबंशीने भेटायला बोलवले. पण त्याने नकार दिला. त्याच रात्री अकरा आरिफ विसावा बारसमोर उभा राहून फोनवर बोलत होता. त्यावेळी आरोपी आले अन् शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला चारचाकी गाडीत टाकले अन् नागपूरच्या दिशेने निघाले. आरीफ याला गाडीतही बेदम मारले अन् सोडून दिले. आरिफ याला मित्रांनी रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर आरीफ याने पोलिसांत तक्रार दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्यानगरच्या राजकारणात खळबळ! ‘बड्या’ नेत्याचे अपहरण अन् मारहाण, VIDEO आला समोर..

श्रीरामपूर। नगर सहयाद्री:- अहिल्यानगर काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून मारहाण करण्यात आली आहे. अपहरण करतानाचे...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींवर महालक्ष्मीची कृपा होणार, दुप्पट नफा मिळणार ! जाणून घ्या तुमचा आजचा दिवस!

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य प्रेमानेच प्रेम वाढते हे कायम लक्षात ठेवा. थोड्या...

सुटकेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह, शहरात खळबळ

Maharashtra Crime News : डोंबिवलीमधील डायघर परिसरातील खाडीत एका सुटकेसमध्ये २५ महिलेचा मृतदेह सापडला...

पारनेरचा चेतन रेपाळे उत्तर महाराष्ट्र केसरी; धुळ्याच्या ऋतिकला केले चितपट, ‘असा’ टाकला डाव..

पारनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा; शिव छत्रपती संकुलचे नाव राज्यस्तरावर पारनेर | नगर सह्याद्री नाशिक जिल्ह्यातील पाथड...