spot_img
अहमदनगरएकनाथभाई, केसरकर अन् शिक्षण आयुक्तांनीच माती खाल्ली हो!

एकनाथभाई, केसरकर अन् शिक्षण आयुक्तांनीच माती खाल्ली हो!

spot_img

वासनांध शिक्षणाधिकारी धनवेला दिली बक्षिसी | केसरकर आणि आयुक्त साहेब, तुमच्या बहिणीबाबत असे घडले असते तर दिली असती ही बक्षिसी?

सारिपाट| शिवाजी शिर्के :-
माता, महिला, मुली यांच्या संरक्षणाच्या निव्वळ बाता मारणार्‍या राज्य सरकारमधील शालेय शिक्षण मंत्री म्हणून काम करणारे दिपक केसरकर यांच्यासह त्यांच्याच खात्याचे शिक्षण आयुक्त म्हणून पुण्यातून शिक्षण विभागाचा गाडा चालवणारे सुरज मांढरे या उच्चपदास्थांनी जामखेडचे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धानवे याला संरक्षण दिल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे. ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिग छळ प्रतिबंध, संरक्षण आणि निवारण अधिनियम २०१३ नुसार लैंगिक छळाच्या व्याख्येमध्ये बाळासाहेब धनवे यांचे वर्तन येत असल्याने त्यांच्यावर कारवाई करावी अशी शिफारस जामखेडच्या गट विकास अधिकार्‍यांसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी शिक्षण आयुक्तांकडे केली असताना आयुक्तांसह शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी याच वासनांध बाळासाहेब धनवे याला पाठीशी घातल्याचे प्रकरण समोर आले आहे. आयुक्तांसह शिक्षणमंत्रीच महिलांचा लैंगिक छळ करणार्‍या धनवे याला पाठीशी घालत असल्याने राज्य सरकारने महिला संरक्षणाच्या कितीही मोठ्या ‘टापा’ मारल्या तरी त्या फोल ठरविल्या गेल्या आहेत. केसरकर आणि मांढरे यांच्या विरोधात या प्रकरणात राज्यातील शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली असून हे प्रकरण आता थेट शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्यावरच शेकणार हे स्पष्ट झाले आहे.

नगर जिल्ह्यातील जामखेड येथे गट शिक्षणाधिकारी म्हणून काम करत असताना बाळासाहेब धनवे या अधिकार्‍याने या महिला शिक्षिकेवर डोळा ठेवत तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. याबाबतचा सविस्तर सारिपाट प्रसिद्ध होताच संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. सात सदस्यांच्या चौकशी समितीने या वासनांध धनवे याच्या विरोधात अहवाल सादर केल्यानंतर तो अहवाल जामखेड गट विकास अधिकार्‍यांनी लागलीच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे सादर केला.

या अनुषंगाने आम्ही त्याच दिवशी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही. मात्र वृत्त प्रसिद्ध होताच जिल्हा परिषद प्रशासनाकडून याबाबतची सविस्तर माहिती पुढे आली. त्यानुसार वासनांध धनवे याच्या विरोधातील अहवाल आशिष येरेकर यांच्या कार्यालयाने दि. ३१ जुलै २०२४ रोजी तयार केला आणि दोषारोप पत्रातील मुद्दा क्र १ ते ४ असा अहवाल तयार झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी त्यावर दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी सही केली. येरेकर यांच्या सहीने सदरचा अहवाल शिक्षण आयुक्तांच्या पुणे कार्यालयास सादर केला गेला.

आयुक्तांच्या कार्यालयास अहवाल सादर झाल्यानंतर शिक्षण आयुक्त म्हणून काम पाहणारे सुरज मांढरे यांनी त्यावर लागलीच कार्यवाही करण्याची गरज होती. मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नाही. एका महिला कर्मचार्‍याच्या बाबत गंभीर प्रकार घडला असताना आणि त्यात शाळेतील मुलांसह चौकशी समिती, गट विकास अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अशा सार्‍यांनीच धनवे याच्यावर कारवाई करण्याचा अहवाल सादर केला असताना गेल्या पंचवीस दिवसात आयुक्तांना त्यावर निर्णय घ्यायला वेळ मिळाला नसल्याचेच यातून पुढे येत आहे.

दरम्यान, प्राप्त माहितीनुसाार हे प्रकरण थेट शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या कार्यालयातूनच दाबण्याचा प्रयत्न झाला असल्याची चर्चा झडत आहे. केसरकर हे स्वच्छ चारित्र्याचे मंत्री म्हणून ओळखले जातात. याशिवाय ते शिस्तप्रिय असल्याची ख्यातीही आहे. मग, असे असताना केसरकर हे या वासनांध धनवे याला पाठीशी का घालत आहेत असा प्रश्न राज्यातीली महिला शिक्षकांना पडला आहे. केसरकर यांच्या अथवा आयुक्त सुरज मांढरे यांच्या बहिणीच्या बाबत असे घडले असते तर त्यांनी या वासनांध धनवे याला पाठीशी घातले असते का असा सवाल आता समोर येत आहे. केसरकर यांच्या विरोधात यानिमित्ताने राज्यातील शिक्षकांमध्ये आणि विशेषत: महिला शिक्षिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

बदलापूरच्या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसह माता- भगिनी, मुली सुरक्षीत असतील आणि त्यांच्या सुरक्षेच्या आड येणार्‍या कोणाचीही गय करणार नसल्याचे जाहीरपणे सांगितले असताना त्यांच्याच पक्षाचे सहकारी आणि राज्याच्या शिक्षण विभागाचे मंत्री म्हणून काम पाहणारे दिपक केसरकर हे एका महिला कर्मचार्‍याला छळणार्‍या वासनांध अधिकार्‍याला पाठीशी घालत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, सदर प्रकरणी आम्ही शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल डायव्हर्ट केला गेला. त्यांच्या स्टेनोने फोन घेतला असता त्यांनी आयुक्त साहेब मिटींग असल्याचे सांगितले.

महिला कर्मचार्‍यांच्या तक्रारींचा पाढा, तरीही केसरकरांनी कसे केले पावन?
जामखेडमध्ये गट शिक्षणाधिकारी म्हणून काम करण्याआधी नगर तालुक्यात आणि जिल्ह्यात काम करणार्‍या बाळासाहेब धनवे याच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या. त्यातही महिलांच्या तक्रारी सर्वाधिक! आचारसंहिता भंगाची तक्रार देखील झाली. महिला शिक्षिकेला वासनांध मानसिकतेतून पाहणार्‍या विकृत धनवे याच्या विरोधात बीडीओ, सीईओ अशा सार्‍यांनीच अहवाल सादर केला असताना हा वासनांध बाळू धनवे मंत्री असणार्‍या दिपक केसरकर यांच्यासह आयुक्तांनी मांडीवर घेतलाच कसा? केसरकर आणि आयुक्तांनी त्यांच्या आया-बहिणींशी असे विकृत मनोवृत्तीतून वागणार्‍याला उपशिक्षणाधिकारी म्हणून नगरमध्येच नियुक्ती दिली! धनवे याच्यावर तातडीने कारवाई होण्याची गरज होती. महिलांमध्ये असुरक्षीतेची भावना निर्माण झाली असताना शासकीय सेवेतील महिलांचा अशा पद्धतीने विकृत मनोवृत्तीतून छळ करणार्‍या धनवे याला केसरकर हेच पाठीशी घालत असल्याने आता केसरकर यांच्याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

केसरकरजी, नगरमध्ये येण्याआधी ‘हे’ नक्की सांगा!
आधीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम पाहणारे आणि आता एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये शिक्षण मंत्री म्हणून काम पाहणारे दिपक केसरकर यांचे नगरी प्रेम तसे जुनेच! मनमाड रस्त्यावरील एका हॉटेल मालकाशी त्यांची गट्टी! व्यवसायाने डॉक्टर असले तरी हॉटेल व्यवसयात त्यांचे नाव! त्यांच्या माध्यमातून दिपकभाई, तुम्ही नगरी मटनाचे खवैय्ये झालात! मटण- भाकरी हा तुमचा आवडता मेणू असल्याने डॉक्टर सांगतात. खरेतर शिक्षण खातं सांभाळताना तुमच्याकडून माता भगिनी आणि मुली यांच्या संरक्षणाबाबत काय निर्णय झाले आणि त्याची अंमलबजावणी कशी झाली हे तुम्हीच एकदा नगरमध्ये येऊन मिडीयासमोर सांगाल अशी अपेक्षा आहे. मात्र, हे करण्याआधी या वासनांध बाळू धनवे याच्यावर गेल्या तीन आठवड्यात कोणतीच कारवाई का केली नाही आणि त्याला उपशिक्षणाधिकारी म्हणून नगरमध्येच का नियुक्ती दिली या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची गरज आहे.

मुख्यमंत्री साहेब; तुमचेच सहकारी तुम्हाला खोटे पाडू लागले आहेत!
राज्यातील माता- भगिनी सुरक्षीत आहेत आणि त्यांच्या केसाला धक्का लागला तरी या एकनाथ शिंदे सोबत गाठ आहे, असं वक्तव्य मध्यंतरी आमच्या वाचनात आले. भाई, शिवसैनिक म्हणून आपण किती आक्रमक आणि महिलांच्या हिताची काळजी करता हे उभा महाराष्ट्र पहात आहे. माता- भगिनींच्या आपल्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, तुमच्याच पक्षाचे सहकारी दिपक केसरकर हे त्यांच्याच खात्यातील एका वासनांध अधिकार्‍याला पाठीशी का घालत आहेत? भाई, तुमचा याच्याशी काहीच संबंध नसेलही! मात्र, राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही आहात! धनवे या वासनांध अधिकार्‍याला तत्काळ निलंबीत करण्याचे आदेश आता तुम्ही द्यालही! मात्र, त्याहीपेक्षा या धनवेला पाठीशी घालणार्‍या दिपक केसरकर यांच्यासह त्यांच्या खात्याचे आयुक्त सुरज मांढरे यांना घरचा रस्ता दाखविण्याची हिम्मत तुम्ही दाखवाल का हा राज्यातील महिला शिक्षिकांचा सवाल आहे.

येरेकर यांच्या अहवालातील जोडपत्र ३ मध्ये गंभीर नोंद, तरीही आयुक्त सुरज मांढरेकडून दखल नाही!
वासनांध बाळासाहेब धनवे याच्या बाबत आयुक्तांना अहवाल सादर करताना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी अत्यंत गंभीर मुद्दे उपस्थित केले आणि धनवे याच्यावर तातडीने कारवाई करण्याची शिफारस केली. त्यातील शेवटच्या परिच्छेदात श्री. येरेकर यांनी म्हटले आहे की, ‘महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणुक) नियम १९७९ मधील नियम ०३ नुसार शासकीय कर्मचारी सदैव निरपवाद व सचोटीने वागेल व कर्तव्य परायण राहील अशी तरतूद आहे. तसेच कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळासंदर्भात प्रतिबंध असताना श्री. बाळासाहेब यमाजी धनवे गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती जामखेड यांनी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम १९७९ मधील नियम ०३ व कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, संरक्षण व निवारण अधिनियम २०१३ तील तरतुदीचा भंग केलेला आहे’. येेरेकर यांनी अत्यंत स्पष्टपणे सारे मुद्दे नमूद करुन अहवाल सादर केलेल्या घटनेस आज २७ दिवसांचा कालावधी झाला आहे. मात्र, आयुक्तांना या अहवालाची दखल घ्यावी असे वाटलेले नाही. त्याहीपेक्षा त्यांनी या वासनांध धनवे याला नगरमध्येच उपशिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती दिली आणि समस्त महिलांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे पाप केले. आता हे पाप आयुक्त सुरज मांढरे आणि शिक्षण मंत्री दिपक केसरकर हे कुठे फेडणार?

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहि‍णींना खुशखबर! जानेवारीचा हप्ता ‘या’ तारखेला मिळणार?

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध झाली आहे....

महाराष्ट्रात थंडी गायब! आजच हवामान कसं? महत्वाची अपडेट..

मुंबई । नगर सहयाद्री:- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील थंडी गायब झाली आहे. देशासह राज्यामध्ये...

‘ज्या ठिकाणी येईल आली तेथे येईल बजरंग बली’;अनधिकृत प्रार्थनास्थळावर हातोडा

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अष्टविनायक पैकी एक तीर्थक्षेत्र असणाऱ्या सिद्धटेक...

बीड की बिहार? पुन्हा दोन सख्ख्या भावांची हत्या! कारण काय?

Crime: बीडच्या मस्साजोगचे सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी...