spot_img
महाराष्ट्रएकनाथ शिंदे विरोधी पक्षात बसणार? 'दाल मे कूछ काला है'; मोठे स्टेटमेंट...

एकनाथ शिंदे विरोधी पक्षात बसणार? ‘दाल मे कूछ काला है’; मोठे स्टेटमेंट समोर..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असताना देखील सत्तास्थापन करीत असताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. महायुतीतील मित्र पक्षांमध्ये मंत्रिपदाच्या वाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचे बोलले जात आहे. याच दरम्यान आम आदमी पक्षाच्या माजी नेत्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर केलेल्या स्टेटमेंटमुळे भलतीच चर्चा पुढे आली आहे. एकनाथ शिंदे विरोधी पक्षात बसणार आहेत का? असा प्रश्न दमानिया यांनी उपस्थित केला आहे.

अंजली दमानिया यांनी दोन पोस्ट टाकून सत्तास्थापनेबाबत वेगळाच दावा केला आहे. त्या म्हणाल्या, “विरोधी पक्षच संपवण्याचा हा भाजपचाच का कट आहे का? सत्ता पण आमचीच आणि विरोधी पक्ष पण आमचाच. बाकी पक्ष / विरोधी पक्ष नेते अस्तित्वात ठेवायचे नाहीत. गावी जाणे, ताप येणे, पुन्हा घरी येणे, पुन्हा बरे न वाटणे ही भाजपाची स्क्रिप्ट वाटते”

या पहिल्या पोस्टनंतर दमानिया यांनी आणखी एक पोस्ट केली आहे. ज्यात त्या म्हणतात, “एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? परवाच संध्याकाळी, आमच्या काही कार्यकर्त्यांना मी एक पत्रकार भाऊंशी झालेला संवाद सांगत होते. ४ दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन भाजपाला समर्थन देणारे शिंदे अचानक गावी गेले, मग ताप काय आला, मग घरी काय आले, दाल मे कूछ काला है.”

अंजली दमानिया यांनी हा कयास कार्यकर्ते आणि माध्यमांशी झालेल्या चर्चेतून लावला आहे. याबाबत त्यांनी कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही. मात्र त्यांच्या या नवीन चर्चेमुळे सत्तास्थापनेबाबतचे गूढ लक्षात येते. भाजपाकडून शपथविधीचा मुहूर्त जाहीर झालेला असला तरी अद्याप गटनेता निवडणे बाकी आहे. तसेच खातेवाटपाची चर्चा अंतिम झालेली नाही, याची माहिती नेत्यांच्या प्रतिक्रियेतून समोर येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

देवभाऊचं ठरलं; महाराष्ट्रात जल्लोष; सत्ता स्‍थापनेसाठी टोकाचे पाऊल…

मुंबई / नगर सह्याद्री - शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष...

आमदार संग्राम जगताप यांचे मंत्रिपद फायनल; कोण काय म्हणाले पहा

शहराचे आमदार संग्राम जगताप यांना मंत्रिपद मिळावे यासाठी ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे...

मोठी बातमी; ब्रेक फेल झाल्याने बस थेट बसस्थानकातच घुसली

प्रवासी झाले जखमी; मोठा अनर्थ टळला पारनेर / नगर सह्याद्री पारनेर येथून मुंबईकडे जाणारी एसटी...

एकच भाऊ देवा भाऊ; गटनेतेपदी फडणवीसांची घोषणा होताच नगरमध्ये जल्लोष

देवेंद्र फडणवीस हे डायनामिक, सक्षम, प्रगतीशील नेतृत्व : अॅड. अभय आगरकर अहिल्यानगर / नगर सह्याद्री...