मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. भाजपच्या बड्या नेत्यांची भेट घेण्यासाठी ते दिल्लीत गेल्याची माहिती आहे. भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात असून अधिवेशन सोडून ते दिल्ली दौऱ्यावर गेल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जवळीक आणि आगामी निवडणुकीत युती झाल्यास याचा शिंदेंच्या शिवसेनेला फटक बसण्याची शक्यता आहे. याशिवाय पक्षांतर्गत आमदार वेगवेगळ्या प्रकरणात टार्गेट केले जात आहेत. या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीत आल्याची माहिती मिळत आहे.
एकनाथ शिंदे यांनी काल (बुधवारी) दिल्लीचा दौरा केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी केंद्रातील अनेक बड्या नेत्यांशी भेट घेतली. मात्र, या दिल्लीवारीमागचं आणि केंद्रीय नेत्यांच्या भेटीमागचं नेमकं कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.
मदिल्लीवारी नेमकी कशासाठी हे अजून कळू शकलेलं नसलं तरी या दौऱ्यामुळे एक विशेष महत्त्व आलेलं आहे,फ अशी माहिती समोर आली आहे.या दौऱ्यामागचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. शिंदेंच्या या दौऱ्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.