मुंबई / नगर सह्याद्री : आठ महिला पोलिसांवर पोलिसांकडूनच अत्याचार झाल्याचा आरोप करणारे पत्र व्हायरल झाले आहे. यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात महिला पोलिसांनी थेट पोलीस खात्यातल्या दोन उपायुक्त, दोन पोलीस निरीक्षक आणि तीन कॉन्स्टेबल्सवर अत्याचाराचा आरोप केलाय.
हे आरोप पोलीस खात्यात काम करणाऱ्या महिला पोलिसांकडूनच झाल्याने खळबळ उडाली आहे. हे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं असल्याची माहिती मिळाली आहे.
जे पत्र व्हायरल होतं आहे त्या पत्रात हा आरोप महिला पोलिसांनी केला आहे की तीन अधिकाऱ्यांनी त्यांना त्यांच्या निवासस्थानी नेलं तिथे त्यांचं लैंगिक शोषण केलं. तसंच आम्ही खेड्यांमधून आलो असल्याने आमचा फायदा घेतला गेला. आम्हाला कामाच्या वेळांमध्ये कुठलीही मोठी जबाबदारी न देण्याच्या बदल्यात दोन पोलीस आम्हाला उपायुक्तांच्या घरी घेऊन गेले आणि तिथे आमच्यावर बलात्कार झाला तसंच लैंगिक शोषणही करण्यात आलं असा उल्लेख या पत्रात आहे.
पती आणि इतर कुटुंबीय गावी आहेत. आम्ही महिला मुंबईत एकट्याच राहतो. पोलीस दलाविषयी आम्हाला नीटशी माहिती अजून झालेली नाही. याचाच गैरफायदा घेतला जातो आहे आणि आमचं लैंगिक शोषण आणि अत्याचार केला जातो आहे असं म्हटलं आहे.
दरम्यान एका मीडियास या पत्रात ज्या महिला पोलिसांची नावं आहेत त्यातल्या एका महिलेने इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की, “जेव्हापासून हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे तेव्हापासून मला धक्काच बसला आहे. कारण मी काय आम्ही कुणीही असं पत्र लिहिलेलं नाही. माझ्या घरातले लोक खूपच चिडले आहेत.