spot_img
ब्रेकिंग'राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय'; दूध उत्पादकांसाठी..

‘राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय’; दूध उत्पादकांसाठी..

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री:-
मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुती सरकारने 8 महत्त्वाचे निर्णय घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती असलेल्या या बैठकीत राज्याच्या विविध क्षेत्रांमध्ये सुधारणा आणि विकासाच्या दृष्टीने ठराविक निर्णय घेण्यात आले.

1. दुग्ध विकासासाठी निधी मंजुरी
विदर्भ आणि मराठवाड्यातील दूध उत्पादकांसाठी दुग्ध विकास प्रकल्पांसाठी 149 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

2. भू-संपत्ती वर्गीकरण
मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे लाखो नागरिकांना लाभ होईल.

3. वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना
डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेला मान्यता देण्यात आली आहे.

4. यंत्रमागांना वीजदर सवलतीची अट शिथिलता
यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट मार्च 2025 पर्यंत शिथिल करण्यात आली आहे.

5. वैद्यकीय शिक्षण विभागात सुधारणा
शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील निवृत्त अध्यापाकांना ठोक मानधन दिले जाईल.

6. रस्त्यांचे काँक्रीटीकरण
6000 किमी रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण करण्यासाठी 37 हजार कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

7. नगराध्यक्षांच्या कार्यकाळात वाढ
नगराध्यक्षांचा कार्यकाळ अडीच वर्षांऐवजी पाच वर्षांचा करण्यात आला.

8.सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी कर्ज करार
सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी केएफ डब्ल्यू कंपनीशी स्थिर व्याजदराने कर्जासाठी करार करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक! प्रियकराच्या घराबाहेर तृतीयपंथीयाची आत्महत्या

पुणे । नगर सहयाद्री:- पुण्यातील तृतीयपंथीयाला जयपूरचा तरूण आवडला. दोघांमधले प्रेम बहरले. ते दोघेही...

नैतिकता : धनुभाऊंना नाहीच; अजितदादा तुम्हाला? धनंजय मुंडेंना किती दिवस पोसणार?, चमच्यांमुळेच बीडची वाट लागली!

खंडणीखोर मुकादम, बेभान कार्यकर्ते, सत्तेचा माज असणारे नेते अन्‌‍ टुकार चमच्यांमुळेच बीडची वाट लागली!सारिपाट...

ट्रक दरीत कोसळून 10 जण ठार; कुठे घडला भयंकर अपघात!

नवी दिल्ली | नगर सह्याद्री:- कर्नाटकमध्ये बुधवारी सकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे एक...

महाराष्ट्राच्या हाती मोठं घबाड! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यात काय-काय घडलं?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतल्या अनेक कंपन्यांच्या भेटी; सव्वासहा लाख कोटींवर गुंतवणूक करार मुंबई | नगर...