spot_img
अहमदनगरBreaking: आमदार प्राजक्त तनपुरे यांना ईडीने पाठवलं समन्स, काय आहे प्रकरण? पहा..

Breaking: आमदार प्राजक्त तनपुरे यांना ईडीने पाठवलं समन्स, काय आहे प्रकरण? पहा..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यावर ईडीन १३ कोटी ३७ लाख रूपयांच्या मनी लाँड्रिंगचा ठपका ठेवला आहे. साखर कारखान्याच्या संदर्भात संदर्भात व्यवहार करताना हा घोटाळा झाल्याचे ईडीचे म्हणणे आहे. आता या संदर्भात मुंबईच्या विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. एन. रोकडे यांनी प्राजक्त तनपुरे आणि अन्य आमदारांना १२ जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.

राम गणेश गडकरी साखर कारखाना विक्री दरम्यान कोट्यवधी रूपयांचा घोटाळा झाला. तसेच यामध्ये मनी लाँड्रिंगही झालं असे ईडीचे म्हणणे आहे. यासंदर्भात आ. प्राजक्त तनपुरे, आ. सुभाष देशमुख, आणि आ. रणजीत देशमुख यांना समन्स बजावण्यात आले आहे. या आमदारांसह प्रसाद शुगर अलाईड आणि अ‍ॅग्रो प्रॉडट लिमिटेड तसेच तक्षशिला सियुरिटीज प्रायव्हेट लिमिटेड प्रमुखांनाही न्यायालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. ईडीच्या आरोपानुसार, राम गणेश गडकरी साखर कारखाना जेव्हा विकला गेला.

तेव्हा बाजारभावानुसार त्याची किंमत २६ कोटी ३२ लाख रूपये एवढी होती. मात्र हा साखर कारखाना केवळ १२ कोटी ९५ लाख रूपयांमध्येच विकला गेला. यात १३ कोटी ३७ लाख रूपयांचा बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाल्याचे ईडीचे मत आहे. ईडीने या कारखान्याची जागाही गिळंकृत करण्याचा आरोप ईडीने केला आहे याबाबत महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेने एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात मूळ गुन्हा दाखल केला होता. ईडीने या गुन्ह्याच्या आधारे ईसीआयआर नोंदवलेला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Election Results 2024 LIVE : अहिल्यानगरमध्ये कोण बाजी मारणार! जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातील लढती? पाहा….

Election Results 2024 LIVE: महाराष्ट्र कुणाचा? महायुती की महाविकास आघाडी? सत्तेत कोण आणि विरोधी...

अहिल्यानगरमध्ये खळबळ! मतपेट्या आणलेल्या बसमध्ये सापडले नोटांचे बंडल

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातील कोपरगाव येथील हि घटना असून मतदानाच्या दुसऱ्या दिवशी चक्क एसटी...

उमेदवारांची धाकधूक वाढली! नगरमध्ये कुणाच्या अंगावर पडणार गुलाल…

विधानसभेच्या परिक्षेचा शनिवारी निकाल | समर्थकांकडून गुलालाची तयारी | चौकाचौकात दावे प्रतिदावे अहिल्यानगर | नगर...

भावी मुख्यमंत्री बाळासाहेब थोरात; संगमनेरमध्ये झळकले फ्लेक्स

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून आता वेध लागलेत ते निकालाचे....