spot_img
अहमदनगर'अहिल्यानगर' जिल्ह्यात ईडीचा छापा! व्हीआयपीएस ग्रुपचा कारभार समोर!, जनावरांच्या गोठ्यात सापडलं घबाड..

‘अहिल्यानगर’ जिल्ह्यात ईडीचा छापा! व्हीआयपीएस ग्रुपचा कारभार समोर!, जनावरांच्या गोठ्यात सापडलं घबाड..

spot_img

Ahilyanagar: गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकांना कोट्यवधींना गंडा घालणार्‍या व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीप्रकरणी कर्जत तालुक्यातील आंबीजळगाव येथे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकार्‍यांनी शुक्रवारी (दि.20) आरोपी किरण पितांबर अनारसे याचा भाऊ अशोक पितांबर अनारसे याच्या घरी छापा टाकला. सुमारे दहा ते बारा तास त्याची कसून चौकशी केली. यामध्ये प्रमुख आरोपी विनोद खुटे, संतोष खुटे, मंगेश खुटे यांच्याशी दुबईशी संबंधित काही महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत.

कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू या गावातील विनोद खुटे यांनी मेसर्स व्हीआयपीएस या नावाने एक ग्रुप स्थापन करून, त्याअंतर्गत अनेक कंपन्यांची निर्मिती केली आणि त्यामध्ये गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपयांची रक्कम कर्जत, जामखेड, अहिल्यानगरमधील काही तालुके तसेच राज्यभर आणि राज्याबाहेरून गोळा केली. ही रक्कम बनावट कंपन्या व खात्यांच्या माध्यमातून व्यवहारात आणली गेली. त्यानंतर हवाला ऑपरेटरच्या माध्यमातून पैसे भारतातून दुबईला पाठविण्यात आले. एवढेच नव्हे, तर हे पैसे तपास यंत्रणांच्या नजरेत येऊ नयेत म्हणून यूएसबीटी कूट चलनाचाही त्यांनी वापर केला. सक्तवसुली संचालनालयाने आतापर्यंत या कंपनीच्या विविध ठिकाणी छापे मारून 75 कोटी 42 लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.

विनोद खुटे यांच्या खर्चाचा तपशील तपासला असता, त्यांनी जमा केलेल्या रकमेपैकी 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च केली आहे. यामधून त्यांनी दुबई आणि भारतात मालमत्ता देखील खरेदी केली आहे. याप्रकरणी पुण्यासह ठिकठिकाणी विनोद खुटे, संतोष खुटे, मंगेश खुटे, किरण पितांबर अनारसे आणि अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जनावरांच्या गोठ्यात दुबईशी संबंधित वस्तू
कर्जत तालुक्यातील आंबीजळगाव येथे अशोक अनारसे यांच्या घरी शुक्रवारी ईडीने छापा टाकला व सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंत चौकशी केली. या तपास पथकाला जनावरांच्या गोठ्यात दुबईशी संबंधित काही वस्तू आढळून आल्या. यानंतर त्यांनी पुन्हा काही तास चौकशी करून अशोक अनारसे यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. अशोक अनारसे यांचा या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारामध्ये संबंध आहे का, याची उलटसुलट चर्चा तालुक्यात सुरू आहे. कर्जत तालुक्यातील गोरगरीब नागरिकांचे कोट्यवधी रुपये यामध्ये अडकले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राज्यात पावसाची रिपरिप वाढणार का?; हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यात येत्या पाच दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान...

भाजपा नेते मनोज मुंगसे यांच्या प्रयत्नांना यश; जीएमसीसी कंपनीचा कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय

पारनेर । नगर सहयाद्री :- सुपा एमआयडीसी मधील जीएमसीसी कंपनीने आपल्या 152 कर्मचाऱ्यांना नवीन...

वाळू माफिया अडकले जाळ्यात; जेसीबी ट्रॅक्टर-ट्रॉली जप्त, कुठे केली कारवाई?

नेवासा । नगर सहयाद्री :- गोधेगाव (ता. नेवासा) येथील गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध...

सरकाचा निर्णय राज ठाकरे यांना मान्य नाही; हिंदी भाषा सक्ती विरोधात ‘या’ तारखेला मोर्चा

शिक्षण मंत्री दादा भुसेंची भेट निष्फळ। हिंदी भाषा सक्तीचा मुद्दा गाजणार मुंबई । नगर सहयाद्री:-...