spot_img
अहमदनगरआमदार रोहित पवारांवर ईडीकडून आरोपपत्र दाखल; वाचा सविस्तर

आमदार रोहित पवारांवर ईडीकडून आरोपपत्र दाखल; वाचा सविस्तर

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री :-
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात ईडीने न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं असून, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचं नाव या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. ईडीने आमदार रोहित पवार आणि इतर काही व्यक्तींविरुद्ध मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदा अंतर्गत पुरवणी आरोपपत्र मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल केले आहे. न्यायालयाने अद्याप या आरोपपत्राची दखल घेतलेली नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

आरोपपत्र दाखल होण्यापूवच अंमलबजावणी संचालनालयाने रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीची 50 कोटी रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त केली होती. जानेवारी 2023 मध्ये ईडीने बारामती ॲग्रोच्या ठिकाणांसह विविध ठिकाणी छापे टाकले. त्यानंतर, कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना चौकशीसाठी ईडीच्या मुंबई कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते.

ईडीच्या आरोपांनुसार, सहकारी बँकेच्या आर्थिक गैरव्यवहारात बारामती ॲग्रोचा थेट सहभाग असल्याचा संशय असून, रोहित पवार यांच्यावर गैरव्यवहारातून आर्थिक लाभ घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी यापूव या चौकशीविषयी सहकार्याची भूमिका असल्याचे स्पष्ट केले होते आणि सर्व आरोप फेटाळले होते. मात्र ईडीच्या या नव्या आरोपपत्रामुळे या प्रकरणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

संघर्षालाच डोक्यावर घेतलेय : आ.पवार
आ. रोहित पवार यांनी पोस्ट करत आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की,कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्याविरोधात ईडीने कारवाई केली हे जगजाहीर आहे, याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही. ईडीचे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी, त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं आणि आता आरोपपत्रही दाखल केलं. म्हणजेच तपास पूर्ण झाला असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या निर्णयाचा चेंडू आता न्यायव्यवस्थेच्या कोर्टात आहे. कारण न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये दूध दूध आणि पाणी का पाणीफ होईलच! विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी आहे..महाराष्ट्राने लाचारीला आणि फितुरीला कधीही थारा दिला नाही आणि संघर्षालाच डोक्यावर घेतलंय, हा इतिहास आहे! असे रोहित पवारांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बा…शनिदेवा घालवणार का तू त्यांचे डोळे!, कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव..

कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव | कोट्यवधी रुपये लुटणारे याच तालुक्यातील | कार्यकर्त्यांना...

अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा! राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण?

मुंबई | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले...

नगर शहरात धक्कादायक प्रकार! महिलेल दिले गुंगीचे औषध अन्…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरात एका 42वर्षीय महिलेची गुंगीकारक औषध देऊन शारीरिक छळ आणि आर्थिक...

अपघाताचा थरार! कार कोसळली, काचा फोडून नालेगावातील दोघांनी अशी केली सुटका..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पंपिंग स्टेशन रस्त्यावरील कराळे क्लब हाऊसजवळ शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक...