spot_img
अहमदनगरखा. लंके यांच्याकडून वारकर्‍यांच्या बुक्क्याची चेष्टा!; संदेश कार्ले यांचा आरोप

खा. लंके यांच्याकडून वारकर्‍यांच्या बुक्क्याची चेष्टा!; संदेश कार्ले यांचा आरोप

spot_img

समस्त वारकर्‍यांचा अपमान करणार्‍या लंकेंनी माफी मागण्याचीही केली मागणी
पारनेर | नगर सह्याद्री
कोणतेही कष्ट न घेता विनासायास पदरात काही पडले की त्याचे मोल राहत नाही. असेच काहीसे खा. निलेश लंके यांच्या बाबतीत झाले असून ते आता वारकर्‍यांच्या बुक्क्याची चेष्टा करत आहेत. आषाढी- कार्तिकीसह कोणत्याही दिवशी आळंदी- पंढरीला आमचे वारकरी जातात. त्यांच्या मनात एक पवित्र भाव असतो. या तिर्थक्षेत्री गेल्यानंतर ते कपाळी बुक्का लावतात. तो बुक्का आणि त्याचे महत्व कधीच समजून न घेता विरोधकांना बुक्का देण्याची भाषा वापरणार्‍या खा. निलेश लंके यांनी वारकर्‍यांचा अपमान केला असून त्यांनी त्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी पारनेर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांनी केली आहे.

संदेश कार्ले यांनी अपक्ष उमेदवारीच्या निमित्ताने नगर तालुक्यातील निंबळक, वडगावगुप्तासह चास, कामरगाव, हिवरेबाजार आदी गावांमध्ये बैठका घेतल्या. या निमित्ताने त्यांनी खा. लंके यांच्यावर थेट हल्ला केला. पारनेरमध्ये कवडीचेही काम न करणार्‍यांनी त्यांच्याच पक्षाचे जामखेडचे आमदार रोहीत पवार यांनी पाच वर्षात काय केले हे जाऊन पहावे असा सल्लाही कार्ले यांनी दिला.

जामखेडला क्रिकेट स्टेडीअम, चांगले रस्ते, हॉस्पिटल, चांग़ल्या शाळा, क्रिडा संकुल, विश्रामगृह, नाना-नानी पार्क, भगवा ध्वज, भक्तनिवास असे सारे उभे राहिले असताना इकडे यांनी आमदार म्हणून काय केले? गावागावात भांडणे लावण्याचे उद्योग लंके यांनी केले असून त्यामुळेच संपूर्ण मतदारसंघात दहशत निर्माण झाली आहे. आता त्यांची दहशत मोडून काढण्याची वेळ आली आहे. मतदानासाठी मतदारांनी निर्भयपणे बाहेर पडावे आणि कोणाच्याही दबावाला बळी न पडता सेवेची संधी द्यावी अशी भावनिक सादही त्यांनी घातली.

पारनेरमध्ये केक, भ्रष्टाचार, वह्यांच्या नावाखाली वसुली अन् मांडवली!
वसुली टोळीचा मसिहा अशी ओळख निर्माण झालेल्या लंके यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. पारनेरमध्ये वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापण्यातून दहशतीच्या पार्टी करण्यात त्यांचेच पाठबळ आहे. तालुक्यात पैसे मोजल्याशिवाय कोणत्याही सरकारी कार्यालयात काम होत नाही. वाढदिवसाच्या निमित्ताने वह्या जमा करण्याची नौटंकी केली जाते. मात्र, प्रत्यक्षात त्या वह्यांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वसुली केली जात असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मांडवली बादशाह झालेला खासदार भेटला हे आता या मतदारसंघाचे मोठे दुर्दैव असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बा…शनिदेवा घालवणार का तू त्यांचे डोळे!, कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव..

कोट्यवधीच्या चोऱ्या तरीही बिना दरवाजाचे गाव | कोट्यवधी रुपये लुटणारे याच तालुक्यातील | कार्यकर्त्यांना...

अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा! राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण?

मुंबई | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले...

नगर शहरात धक्कादायक प्रकार! महिलेल दिले गुंगीचे औषध अन्…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरात एका 42वर्षीय महिलेची गुंगीकारक औषध देऊन शारीरिक छळ आणि आर्थिक...

अपघाताचा थरार! कार कोसळली, काचा फोडून नालेगावातील दोघांनी अशी केली सुटका..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री पंपिंग स्टेशन रस्त्यावरील कराळे क्लब हाऊसजवळ शुक्रवारी दुपारी एक धक्कादायक...