spot_img
अहमदनगरAhmednagar politics: खा. विखे यांनी घेतला विरोधकांचा खरपूस समाचार! म्हणाले, ‘त्यांची’ क्षमता...

Ahmednagar politics: खा. विखे यांनी घेतला विरोधकांचा खरपूस समाचार! म्हणाले, ‘त्यांची’ क्षमता किती, वजन किती? ते पहा अन…

spot_img

खा. विखे यांनी कांदा निर्यातबंदी उठवल्याबद्दल शेतकर्‍यांच्या वतीने मानले मोदी-शहांचे आभार
सुनील चोभे / अहमदनगर
अनेक जण केवळ फोटो काढण्यापुरते मागण्यांचे निवेदन देतात. मात्र विखे कुटुंबाने दिलेली आश्वासने फोटोसेशन न करता पूर्ण केली आहेत. दूध अनुदान, कांदा अनुदान, शहरातील उड्डाणपूल, बायपास आदी प्रश्न आम्ही कोणताही गाजावाजा न करता नागरिकांसाठी पूर्ण केलेले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये नागरिकांनीही उमेदवार कोण, त्याचे शिक्षण किती, त्याची कार्यक्षमता किती, त्याचं केंद्र सरकारमध्ये असलेलं वजन किती, त्याच्या कुटुंबाचे राजकारण, समाजकारणातील योगदान किती, त्यांनी केलेली कामे, त्यांची समाजाशी असलेली नाळ या सर्व गोष्टींचा विचार नागरिकांनी करावा असे आवाहन खासदार सुजय विखे पाटील यांनी करत विरोधकांचे नाव न घेता खरपूस समाचार घेतला.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कांदा निर्यात बंदी उठवण्यात आली. केंद्र सरकारच्या निर्णयाचे खा. सुजय विखे यांनी आभार मानले आहेत. त्याचबरोबर मंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे कांदा निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवली या अनुषंगाने शेतकर्‍यांच्या वतीने नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खासदार सुजय विखे यांचा सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, हरिभाऊ कर्डिले, सुरेश सुंबे, निखिल वारे, बाळासाहेब पवार, धर्माजी आव्हाड आदी उपस्थित होते.

खा. विखे म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, अजित पवार यांच्या माध्यमातून वारंवार केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेत राज्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या अडचणी मांडण्यात. नगर, नाशिक, पुणे पट्ट्यातील कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणात असल्याने कांदा निर्यात बंदीचा फटका बसत असल्यामुळे शेतकर्‍यांना दिलासा देणे गरजेचे असल्याची भूमिका खासदार म्हणून आपण मांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनीही शेतकर्‍यांच्या अडचणी समजून घेत तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मोदी गॅरेंटी यानुसार केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली आहे. हा एक प्रकारे नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या संघर्षाचा विजय असल्याचे खा. विखे म्हणाले.

कांदा निर्यात बंदीबाबत केलेल्या पाठपुराव्यामुळे बंदी उठली आहे. मंत्री अमित शहा यांनी तीन लाख मॅट्रिक टन कांद्याला निर्यात परवानगी दिलेली आहे. या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जवळपास ५० हजार टन कांदा एकट्या बांगलादेश साठी भारतातून निर्यात होण्यासाठी ही परवानगी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी भाषणात मोदी सरकारमुळे आपल्याला आता पुन्हा एकदा तिसर्‍यांदा दिवाळी साजरी करण्याची पर्वणी मिळाली आहे असे वक्तव्य केले. अनेक जण टीका करायची म्हणून काहीही टीका करत असले तरी दिलेले आश्वासन पाळणे ही विखे कुटुंबाची ओळख असल्याचे कर्डिले यावेळी म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नडणाऱ्यांसह काँग्रेस अन्‌‍ ठाकरे सेना क्लीन बोल्ड

महानगरपालिकेत डॉ. सुजय विखे पाटील -आमदार संग्राम जगताप एक्सप्रेेस निर्णायक ठरणार! सारिपाट / शिवाजी शिर्के प्रभाग...

वनविभागाच्या हलगर्जीपणामुळेच तरुणाचा बळी!, कळस येथील घटनेला जबाबदार कोण?

पिंजरा लावण्याची जबाबदारी का झटकली? गणेश जगदाळे। पारनेर पारनेर तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या जुन्नर तालुका राज्यात बिबट्या...

जिल्ह्यात लेझर लाईट, दबाव हॉर्न व कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर बंदी

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) नुसार...

मैदान ठरलं; तोडफोडीमुळे ‘अशी’ राजकीय गणिते बदलली!, आता आरक्षणाकडे नजरा..

सुनिल चोभे | नगर सह्याद्री अहिल्यानगर महापालिका निवडणुकीची उलटगणती सुरु झाली असून निवडणुकीचा राजकीय रंग...