spot_img
ब्रेकिंग'कुख्यात गुंड गजा मारणेकडून खा. नीलेश लंकेंचा सत्कार'

‘कुख्यात गुंड गजा मारणेकडून खा. नीलेश लंकेंचा सत्कार’

spot_img

पुण्यात भेट झाल्याचा व्हिडीओ व्हायरल
पुणे | नगर सह्याद्री
कुख्यात गुंड गजानन उर्फ गजा मारणे याची पुण्यात दहशत आहे. कुख्यात असल्याने त्याच्यापासून चार हात लांब राहलेले बरं अशीच काहींची भूमीका आहे. मात्र राजकारणी त्यास अपवाद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचीत खासदार निलेश लंके यांनी नुकतीच गजा मारणे याची पुण्यात भेट घेतली.

यावेळी गजा मारणे याने लंके यांचा सत्कार ही केला. लंके यांची प्रतिमा एक सर्व सामान्य कुटुंबातील सर्व सामान्यांचा नेता अशी आहे. या छबीवरच त्यांनी लोकसभेचे मैदानही मारले. मात्र गजा मारणेच्या भेटीनंतर ते नव्या वादात अडकण्याची दाट शयता आहे.

शरद पवारांचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके कुख्यात गुंड गजा मारणेच्या घरी गेले होते. यावेळी गजा मारणेकडून खासदार नीलेश लंके यांचा सत्कार करण्यात आला. लंके गजा मारणेच्या भेटीला गेल्याने सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनीही गजा मारणेची भेट घेतली होती. त्यावेळी पार्थ पवार यांच्यावर जोरदार टिका करण्यात आली. टिका करण्यामध्ये शरद पवार गट आघाडीवर होता.

मात्र आता आपल्याच पक्षाचा खासदार गजा मारणेला भेटला यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची कोंडी झाली आहे. त्याला ते काय उत्तर देतात ते पहावे लागणार आहे. विशेष म्हणजे खासदार नीलेश लंके यांची प्रतिमा ही सर्व सामान्यांचा नेता अशी आहे. अशा वेळी कुख्यात गुंडाला ते का भेटतात? त्याच्याकडून सत्कारही स्विकारतात असा प्रश्न सर्व सामान्यांना पडला आहे.

काही दिवसांपूर्वी पुणे पोलीस आयुक्तालयात बोलवून गजा मारणेला पोलीस आयुक्तांकडून समज देण्यात आली होती. शिवाय पुण्यातल्या कुख्यात गुंडांची परेडही घेण्यात आली. त्यात गजा मारणेही होता. काही दिवसांपूर्वीच गजा मारणेच्या पत्नीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. गजा मारणेवर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी यासारखे गुन्हे दाखल आहेत. जेलमधून सुटका झाल्यानंतर त्याची मिरवणूक काढण्यात आली होती. त्या विरोधातही गुन्हा दाखल आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...