spot_img
अहमदनगरशिर्डीच्या जागेचा तिढा सुटला, महाआघाडी, महायुतीकडून 'यांना' मिळाली उमेदवारी

शिर्डीच्या जागेचा तिढा सुटला, महाआघाडी, महायुतीकडून ‘यांना’ मिळाली उमेदवारी

spot_img

शिर्डी | नगर सह्याद्री
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून अनेक मतदारसंघात इंडिया आणि एनडीएचे उमेदवार जाहीर झाले. परंतु राज्यातील अनेक मतदारसंघ असे आहेत, ज्यामध्ये महायुती आणि महाआघाडीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. त्यात शिर्डी लोकसभा मतदारसंघ देखील आहे.

शिर्डीत महायुतीकडून उमेदवार ठरला नसला तरी तेथे ठाकरे गटाकडून मात्र भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव जवळपास फायनल झाले असल्याचे समजते. दरम्यान आता शिर्डीतून पुन्हा एकदा मीच महायुतीचा उमेदवार असेल असे म्हणत खा. सदाशिव लोखंडे यांनी दंड थोटपले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला कामाला लागा असे सांगितले असल्याचे खा. लोखंडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

यावेळी खा. लोखंडे पुढे म्हणाले, दोन्ही निवडणुकीत भरघोस मतांनी मला तुम्ही निवडून आणले आहे. मी शेतकर्‍यांसाठी कामे केले असून २०२३ ला शेतकर्‍यांच्या शेतात पाणी आणू शकलो असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे केंद्र व राज्याच्या मदतीने १८२ गावांना पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे ते म्हणाले.

दहा कोटी नाकारणारा पाहिजे की दहा लाख खाणारा?
तुपामध्ये पैसे खाणारा खासदार पाहिजे का? हे जनतेने ठरवायचंय. वाकचौरेंची ३२ वर्ष प्रशासकीय सेवा झाली. माझी ४० वर्ष जनतेत सेवा आहे. दिल्लीतील स्टिक ऑपरेशनमध्ये मी दहा कोटी रुपये नाकारले होते आणि साईबाबा संस्थानच्या घोटाळ्यात त्यांनी दहा लाख खाल्ले. मी त्यांच्यापेक्षा बरा असून लोकांना दहा कोटी नाकारणारा पाहिजे की दहा लाख खाणारा? असा सवाल देखील खासदार लोखंडे यांनी उपस्थित करत वाकचौरेंवर टीका केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

शासकीय कामात अडथळा; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल, वाचा नगर क्राइम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भिंगार परिसरात घरगुती वादाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपींनी धक्काबुक्की...

शरद पवार यांचा गंभीर आरोप; महायुतीच्या नेत्यांवर केली टीका., वाचा सविस्तर

मुंबई | नगर सह्याद्री निवडणुकीत कामावर नाही तर पैसे-निधीवर मतं मागितली जात आहेत. पैसे किती...

नो-पार्किंग कारवाईतील दंड कमी करा; अन्यथा मनपावर मोर्चा, कोणी दिला इशारा…

अहिल्यानगर / नगर सह्याद्री शहरातील वाहतूक नियोजनाच्या नावाखाली नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर करण्यात येणारी...

वारंवार वीज पुरवठा खंडीत, उद्योजकांना फटका; प्रश्न सोडविण्यासाठी बैठक, काय झाला निर्णय?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नगर-एमआयडीसी परिसरातील उद्योगांना वीज पुरवठा खंडित होण्यामुळे तीव्र फटका बसत असून,...