spot_img
ब्रेकिंगमहाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप, भाजप खासदार ठाकरे गटात

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप, भाजप खासदार ठाकरे गटात

spot_img

जळगाव / नगर सह्याद्री –
जळगावच्या राजकारणात आता मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. कारण भाजपचे सध्याचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील उद्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उन्मेष पाटील यांची ही नाराजी भाजपला डोकेदुखी ठरु शकते. कारण उन्मेष पाटील यांची चाळीसगावात चांगली ताकद आहे.

जळगावच्या राजकारणात आता मोठा ट्विस्ट येणार आहे. कारण सध्याचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील हे आता ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. भाजपकडून उन्मेष पाटील यांचं लोकसभा निवडणुकीचं तिकीट कापण्यात आलं आहे. त्यामुळे उन्मेष पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या दुपारी बारा वाजता उन्मेष पाटील यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश होणार आहे. त्यांच्यासोबत पारोळा माजी नगराध्यक्ष करन पवार हे सुद्धा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उन्मेष पाटील यांनी आज सकाळी जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केल्याची माहिती समोर येत आहे.

उन्मेष पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजपचे खासदार आहेत. त्यांनी याआधी 2014 मध्ये आमदारकीची निवडणूक लढवली होती आणि ते चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात आमदार होते. मात्र यावेळी उन्मेष पाटील यांना भाजपकडून जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळता स्मिता वाघ यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे उन्मेष पाटील नाराज असल्याची चर्चा होती. याच नाराजीतून त्यांनी आज ठाकरे गटाच्या नेत्यांची भेट घेतली आहे.

महाविकास आघाडीत जळगाव लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटासाठी सुटला आहे. ठाकरे गटाकडून या जागेसाठी उमेदवाराची घोषणा झालेली नाही. उन्मेष पाटील आणि करण पवार हे जर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत असतील तर जळगाव लोकसभा मतदारसंघातून नेमकी उमेदवारी शिवसेना ठाकरे गटाकडून कोणाला मिळते ते आता पहने महत्वाचे ठरणार आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये ग्राम महसुल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

  अहिल्यानगर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण (ता. नगर) येथील ग्राम महसुल अधिकारी दिपक साठे यास लाचलुचपत...

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...