spot_img
राजकारणअजित पवार यांच्या भाषणावेळी तरुणांचा गोंधळ, भंडाऱ्यात नेमकं काय झालं पहा..

अजित पवार यांच्या भाषणावेळी तरुणांचा गोंधळ, भंडाऱ्यात नेमकं काय झालं पहा..

spot_img

भंडारा / नगर सह्याद्री : सध्या महाराष्ट्रात फडणवीस-शिंदे-पवार यांचे सरकार आहे. त्यांनी विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन वेगवेगळ्या जिल्ह्यात केलं आहे. आता याच नियोजन आज भंडाऱ्यात होत.

या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केलं. ते नुकतेच डेंग्यू आजारातून बाहेर पडल्यानंतर प्रथमच सभेत बोलणार होते. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.परंतु या कार्यक्रमात त्यांच्या भाषणावेळी मोठा गोंधळ पाहायला मिळाला. तरुणांनी यावेळी गोंधळ घातला. भंडारा येथील चैतन्य मैदानावर आज दुपारी सुरू झालेल्या अजित पवार यांच्या भाषणादरम्यान प्रहारच्या कार्यकर्त्यांनी मंचापुढे गोंधळ घातला.

शेतकऱ्यांना आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यास शासन असमर्थ ठरत असल्याने निषेध व्यक्त करीत विनोद वंजारी मंचापुढे आले व ‘खुर्च्या खाली करा’ अशा घोषणा देण्यास सुरवात केली. अचानक काही तरुणांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. या तरुणांनी कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी या तरुणांना तातडीने ताब्यात घेतलं. पण तरीही काही काळासाठी गर्दीमधील वातावरण तणावाचं बघायला मिळालं.

या कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की, “जनतेच्या घरापर्यंत, दारापर्यंत सरकारी योजना पोहोचाव्यात यासाठीच महायुती सरकारने शासन आपल्या दारी कार्यक्रम सुरु केला. काही दिव्यांग होते, काही महिला बचत गट उत्तम पद्धतीने चालवतात, आपण काहींना ट्रॅक्टर दिलेलं आहे.

अनेक गोष्टी देण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. शेवटी सरकार काम करत असताना तो कार्यक्रम लोकाभिमुख झाला पाहिजे. त्या कामातून प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे की, हे सरकार माझा विचार करतंय. त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार काम करतंय”, असं अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरातील तीन समाजकंटक हद्दपार; वाचा नगर क्राईम

​अहिल्यानगर । नगर सह्याद्री ​अहिल्यानगर शहरात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कोतवाली...

जिल्हा बँक सोनेतारण व्यवसाय वाढवणार : चेअरमन चंद्रशेखर घुले

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोनेतारण व्यवसायात वाढ करणार...

सामूहिक आत्महत्येने नाशिक हादरले, ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने २ मुलांसह विहिरीत मारली उडी

नाशिक / नगर सह्याद्री - नाशिकमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने दोन मुलांसह सामूहिक आत्महत्या केल्याची घटना...

मनपाच्या मतदार यादीत २० हजार नावांची हेराफेरी; कोण काय म्हणाले पहा

दोषींवर गुन्हा दाखल करण्याची नितीन भुतारे यांची मागणी अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर महानगरपालिकेने...