spot_img
अहमदनगर'स्त्री भ्रूण हत्येमुळे भविष्यात आईचा दुष्काळ पडणार'

‘स्त्री भ्रूण हत्येमुळे भविष्यात आईचा दुष्काळ पडणार’

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
स्त्री जन्माचे स्वागत हा एक उत्तम संस्कार आहे. स्त्री व पुरुष हे एकाच गाडीची दोन चाके असून ते एकमेकांना परस्पर पुरक आहेत. सुखी समाजाची व्यवस्था आईच्या प्रेमाने बांधली जाते. आज स्त्री भ्रूणहत्येमुळे भविष्यातील आईचा दुष्काळ पडण्याची चिन्हे आहेत, असे प्रतिपादन नेत्ररोग तज्ज्ञ तथा ‌‘स्त्री जन्माचे स्वागत करा‌’ या चळवळीच्या प्रणेत्या डॉ. सुधा कांकरिया यांनी केले. सामाजिक उन्नतीचा मार्ग स्त्री-पुरूष समानतेतून जातो, असेही त्या म्हणाल्या.

नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथील ग्रामपंचायतीत झालेल्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमात डॉ. सुधा कांकरिया बोलत होत्या. विषय होता स्त्रीजन्माचे स्वागत.‌’ श्रीराम विद्यालय राळेगण म्हसोबा अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना + 2 स्तर व रोटरी क्लब ऑफ अहमदनगर द्वारे आयोजित सदर कार्यक्रमात रोटरीचे अध्यक्ष नितिन थाडे, सचिव सुभाष गर्जे, संचालक श्री. व सौ. क्षीरसागर तसेच सरपंच सौ. दीपाली सुधीर भापकर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. तारका भापकर, एनएसएस को-ऑर्डिनर प्रा. डॉ. दत्तात्रय नकुलवाड, प्रा. बाबासाहेब दुधाडे व्यासपीठावर उपस्थित होते.

आईच्या वात्सल्याविना जगाचे वाळवंट होऊ पहात आहे. आज आपण वेळीच जागे झालो आणि घरोघरी स्त्रीजन्माचे स्वागत झाले तर स्त्री-पुरुष यांच्या विषम संख्येची दरी भरून निघेल व समाजात सुख, शांती नांदू लागेल. त्यासाठी विवाह सोहळ्यातील आठवा फेरा स्त्रीजन्माच्या स्वागताचा तसेच गरोदर मातांना देण्यात येणारे योग्य पोषण, गर्भसंस्कार व गर्भरक्षणाचे धडे, मुलीच्या जन्माच्या स्वागताचा संस्कार महत्तवूपर्ण ठरतो. असे डॉ. सुधा कांकरिया म्हणाल्या. स्त्रीजन्माच्या स्वागताचा 11 कलमी कृती कार्यक्रमाची माहितीही त्यांनी सांगितली. सामाजिक समस्यांचे निवारण केल्यास समाजामध्ये शांतता नांदते असेही त्या म्हणाल्या.

सुरुवातीस मुलगीच आहे पणती, दोन्ही घरी उजेड देती‌’ या विषयावर गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. या प्रसंगी स्त्रीजन्माच्या स्वागताचे ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आले. यामध्ये एनएसएस विद्याथ विद्यार्थिनींनी घेतलेल्या ठरावाचे वाचन प्रा. श्रीमती गांधी यांनी केले. ग्रामपंचायतीच्या वतीने आशा हेल्थ वर्कर श्रीमती कुलांगे आणि विद्यालयाच्या वतीनी जेष्ठ शिक्षक श्री. गुंड यांनी ठरावाचे वाचन केले. सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. या प्रसंगी फक्त मुली असलेल्या परिवारांचा तसेच गरोदर मातांचा, गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला.

सर्वांनी स्त्रीजन्माच्या स्वागताची सामूहिक शपथ घेतली. रोटरीचे अध्यक्ष नितिन थाडे यांनी खास विद्यार्थ्यांच्या विकासासाठी इनट्रॅक्ट क्लबची सुविधा उपलब्ध करून देण्याविषयी माहिती सांगितली. अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका तारका भापकर म्हणाल्या की, स्त्रीजन्माचे स्वागत‌’ हा कार्यक्रम काळाची गरज आहे. डॉ. सुधाताईंच्या माध्यमातून गांवामध्ये योग्य प्रकारे जनजागृती झाली असून आम्हीही विद्यालयाच्या गॅदरींगच्या वेळेस नवजात बालिका व त्यांच्या मातेचा यथोचित सत्कार करू. पालक सभेत या विषयी माहिती सांगू. आम्ही घेतलेल्या ठरावाचे आम्ही नक्कीच पालन करू.

महाविद्यालयाच्या वतीने प्रा. डॉ. नकुलवाड यांनी स्वागत करून राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाची सविस्तर माहिती सांगितली. प्रा. बाबासाहेब दुधाडे यांनी आभार मानले. रोटरीच्या वतीने सचिव सुभाष गर्जे यांनी आभार मानले. या प्रसंगी डॉ. सुधा कांकरिया लिखित – ‌‘स्त्री जन्माचे स्वागत करा मार्गदर्शिका, बेटी नही तो बहु कहाँसे लाओगे?, खुडू नको कळी आई, प्रिय गोडूलीस, दृष्टी, रंगमंच ई. पुस्तके वाचनालयास भेट देण्यात आली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सोडू नका; मंत्री धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

Politics News: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये धनजंय...

साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक; गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

शिर्डी । नगर सहयाद्री:- भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक होत असल्याचा...

‘पारनेरला शनिवारी राष्ट्रवादीचा मेळावा’; कोण राहणार उपस्थित?

तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर यांची माहिती पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या...

‘कष्टाचे दाम मिळविण्यासाठी बळीराजाचा संघर्ष’

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील बाजारात भाज्यांचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य समाधान व्यक्त करत...