spot_img
अहमदनगरदारूड्याचा भाऊजीवर सपासप चाकूहल्ला ; कुठे घडला प्रकार पहा

दारूड्याचा भाऊजीवर सपासप चाकूहल्ला ; कुठे घडला प्रकार पहा

spot_img

लालटाकी येथे कौटुंबिक वाद विकोपाला; पत्नीलाही बेदम मारहाण

अहिल्यानगर | नगर सह्याद्री

येथील लालटाकी भागातील बारस्कर कॉलनीत एका दारुड्या मेव्हण्याने कौटुंबिक वादातून आपल्या भाऊजीवर टोकदार चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आईला शिवीगाळ का करतो, याचा जाब विचारल्याचा राग मनात धरून आरोपीने हे कृत्य केले. या हल्ल्यात भाऊजी गंभीर जखमी झाला असून, आरोपीने फिर्यादीच्या पत्नीलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

याप्रकरणी ओंकार रवींद्र ननवरे (वय २५, रा. बारस्कर कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. ओंकार यांच्या फिर्यादीवरून आरोपी मेव्हणा असिफ इकबाल खान (रा. बारस्कर कॉलनी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओंकार ननवरे आणि आरोपी असिफ खान हे एकमेकांचे नातेवाईक असून शेजारीच राहतात. आरोपी असिफ याला दारूचे व्यसन आहे. गेल्या सहा महिन्यांपासून त्याची पत्नीही त्याला सोडून गेल्याने तो नेहमी ओंकार यांना शिवीगाळ व मारहाण करत असे.काल (दि. २९) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ओंकार कामावरून घरी आले असता, आरोपी असिफ हा दारूच्या नशेत स्वतःच्या आईला (ओंकार यांच्या सासूला) शिवीगाळ करत होता. यावेळी ओंकार यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. तसेच, ओंकार यांच्या पत्नीनेही ’आईला मारहाण का करतो’ असे म्हणत त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला.

याचाच राग आल्याने असिफने किचन रूममधून टोकदार चाकू आणला आणि ओंकार यांच्यावर हल्ला चढविला. त्याने ओंकार यांच्या डाव्या हातावर, पोटावर आणि उजव्या गालावर चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. यावेळी मध्यस्थी आलेल्या ओंकार यांच्या पत्नीलाही त्याने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेनंतर जखमी ओंकार ननवरे यांनी रुग्णालयातून दिलेल्या जबाबावरून आरोपी असिफ खान याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस अंमलदार अहिल्या गलांडे करीत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘गाडी बाजूला घे’ म्हटल्याचा राग; एसटी बसचालकाला मारहाण, बसवर दगडफेकही

  अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील पुणेरोड बसस्थानकाजवळील स्वस्तिक चौकात ‘एसटी बस वळवण्यास अडथण होत आहे,...

प्रस्तापितांचा विरोध पत्करला पण शिवाजीराव कर्डीले यांनी सर्वसामान्यांशी नाळ तुटू दिली नाही, आता अक्षय कर्डीले यांनी…

  आम्ही सर्व अक्षय कर्डिलेंच्या पाठिशी ः प्रा. राम शिंदे/ सहकार सभागृहातील सर्वपक्षीय शोकसभेत स्व....

उमेदवारांसाठी आनंदाची बातमी, आयोगाने घेतला सर्वात मोठा निर्णय

मुंबई / नगर सह्याद्री - महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे महाराष्ट्रात पडघम वाजले आहेत....

कर्जमाफीसाठी मरायलाही तयार, बच्चू कडू ढसाढसा रडले, काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्यादी - प्रहार संघटनेचे प्रमुख आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडून...