spot_img
अहमदनगरपारनेरमध्ये दुष्काळ: कुकडीचे आवर्तन 'या' तारखेला सोडा, शेतकऱ्यांचे आ. पवार यांना निवेदन

पारनेरमध्ये दुष्काळ: कुकडीचे आवर्तन ‘या’ तारखेला सोडा, शेतकऱ्यांचे आ. पवार यांना निवेदन

spot_img

राळेगण थेरपाळ / नगर सह्याद्री –
कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी राळेगण थेरपाळे येथे आज धावती भेट दिली. यावेळी त्यांचे लोकनियुक्त सरपंच पंकज कारखिले यांनी जोरदार स्वागत केले. यावेळी आमदार रोहित पवार यांना कुकडी कालव्याच्या संदर्भात निवेदन देण्यात आले.

कुकडी आवर्तन १५ डिसेंबर रोजी सुटणार आहे. परंतु कमी पावसामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असून पिण्याच्या पाण्याचे व शेतीच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. कुकडीचे आवर्तन हे १ डिसेंबरला सुटण्यासाठी आपण पाठपुरावा करावा. शेतकरी बांधवांची ही विनंती आहे. असे निवेदन यावेळी आमदार रोहित पवार यांना देण्यात आले.

यावेळी राळेगण थेरपाळ सरपंच पंकज कारखिले, माजी पंचायत समिती सदस्य शिवाजीराव गाडीलकर ,चेअरमन सचिन कारखिले, उपसरपंच नरेश सोनवणे, तंटामुक्ती अध्यक्ष शशिकांत कारखिले, संपदा पतसंस्था संचालक पांडुरंग कारखिले, प्रगतशिल शेतकरी किसनराव कारखिले, विठ्ठल तात्या कारखिले, संदिप डोमे, सुपेकर मामा, दत्तात्रय कारखिले, अशोक कारखिले, दत्तु घावटे, अजित कारखिले, प्रविण कारखिले, सोन्याबापू डोमे, सुयश कारखिले, दिनेश कारखिले, रामभाऊ कारखिले,दामोदर कारखिले, जयदीप कारखिले, सागर कारखिले, सागर डोमे, अमोल कारखिले, राहुल कारखिले, महेश कारखिले, विजय गाडीलकर, ज्योतिराव कारखिले, आदी राळेगण थेरपाळ येथील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...