spot_img
अहमदनगरनगरच्या 'या' गावात पुन्हा ड्रोनच्या घिरट्या? ग्रामस्थांमध्ये घबराट

नगरच्या ‘या’ गावात पुन्हा ड्रोनच्या घिरट्या? ग्रामस्थांमध्ये घबराट

spot_img

निघोज | नगर सह्याद्री:-
निघोजसह परिसरातील गावांत तसेच वाडी, वस्तीवर मंगळवारी (दि.१६) रात्री दहा ते एकच्या दरम्यान ड्रोनच्या मोठ्या प्रमाणात घिरट्या वाढल्याने जनतेमध्ये घबराट पसरली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. नीलेश लंके यांनी याबाबत जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना याबाबत विचारणा करत कारवाईंची मागणी केली आहे.

मंगळवारी (दि.१६) रात्री निघोज, गाडीलगाव, गुणोरे, देवीभोयरे, वडगाव गुंड, मोरवाडी, भांबरेमळा, रसाळवाडी, ढवणवाडी, वडनेर परिसरात रात्री दहा ते एक वाजेपर्यंत ड्रोन मोठ्या संख्येने आकाशात घिरट्या घालत आहेत. याबाबत शेजारील गावा असणारे वडनेर, टाकळी हाजी, माळवाडी, भाकरेवाडी या परिसरात सुद्धा गेली अनेक दिवसांपासून ड्रोन घिरट्या घालत आहेत.

याबाबत तेथील जनतेने पोलीस व तहसील प्रशासन यांना वेळोवेळी कळविले आहे. असे असूनही प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी याबाबत कोणतीही माहिती घेण्याची तसदी घेतली नाही. हाच प्रकार सातत्याने नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा तसेच इतर तालुक्यातील गावात सातत्याने होत आहे.निघोज परिसरात तर मंगळवार दि.१६ रोजी रात्री उशिरा पर्यंत हे ड्रोन राजरोसपणे फिरत होते.

मात्र याचा शोध घेण्यासाठी प्रशासनातील अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. ड्रोनचा शोध घेण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार नीलेश लंके यांनी तातडीने प्रशासनातील संबंधित अधिकार्‍यांना सुचना देऊन ड्रोनचा शोध घेत जनतेच्या मनातील घबराट दूर करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...