spot_img
अहमदनगरदारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा घालणे पडले महागात; पोलिसांनी केले असे...

दारू पिऊन रस्त्यावर धिंगाणा घालणे पडले महागात; पोलिसांनी केले असे…

spot_img

कुष्ठधाम रोडवर मध्यरात्री मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा; दोघे जण पोलिसांच्या ताब्यात / ​सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या तरुणांवर तोफखाना पोलिसांची कारवाई
​अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शहरातील कुष्ठधाम रोड परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणे दोन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. रात्रगस्तीवर असलेल्या तोफखाना पोलिसांच्या पथकाने या दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

​गणेश जालींदर गायकवाड (वय ३२, रा. उभा मारुती समोर, बोल्हेगाव) आणि पवन वसंत देवतरसे (वय २१, रा. कुंभार गल्ली, नालेगाव) अशी ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
​याबाबत अधिक माहिती अशी की, तोफखाना पोलीस ठाण्याचे पथक दिनांक ६ नोव्हेंबर रोजी रात्री गस्तीवर होते. पहाटे सुमारे ०२:१५ वाजता, पोलीस कर्मचारी सतिष शिंदे, पोकॉ सचिन डाके आणि पोसई राजेश दिनकर यांचे पथक प्रोफेसर चौकाकडून कुष्ठधाम रोडने पेट्रोलींग करत होते.

​त्यावेळी, बालाजी सँडविच दुकानाच्या शेजारी गणेश गायकवाड व पवन देवतरसे हे त्यांच्या मोटारसायकलजवळ बसलेले पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता, दोघांच्याही तोंडाचा आंबट व उग्र वास येत होता. तसेच, त्यांची चाल अडखळत होती व ते असंबद्ध बोलत होते.

​पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी केली असता, त्यांनी मद्यप्राशन केले असल्याचा प्राथमिक अहवाल डॉक्टरांनी दिला.
​सार्वजनिक ठिकाणी नशेच्या अवस्थेत फिरून गैरवर्तवणुक केल्याप्रकरणी, पोलीस कर्मचारी सतिष मारुती शिंदे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

“‘मत चोरी’तून सत्तेत आलेल्या सरकारची ‘जमीन चोरी’ ; राहुल गांधींचा मोदी, फडणवीसांवर निशाणा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे पार्थ पवार आरोपांच्या चक्रव्यूहात सापडलेले...

पतीच्या अपहरणाचा कट; पोलिसांनी केला भांडाफोड, फिर्यादीच निघाला आरोपी..

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री ​भलत्याच व्यक्तींना गंभीर गुन्ह्यात अडकवण्याच्या उद्देशाने स्वतःच्या पतीच्या अपहरणाचा खोटा...

खळबळजनक! हत्येच्या कटात मुंडेंचा हात; मुंडे म्हणाले त्यांची आणि माझी

बीड / नगर सह्याद्री : धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप मराठा...

नगरमध्ये तरुणाच्या घरासमोर तिघांचा पहाटे राडा, मोटारसायकलींची तोडफोड, काय घडलं पहा

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - ​"तो जर आम्हांला दिसला तर आम्ही त्याला जिवे ठार...