spot_img
अहमदनगरPolitics News:"मंत्री विखे पाटील यांच्या नियोजनामुळे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण"

Politics News:”मंत्री विखे पाटील यांच्या नियोजनामुळे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण”

spot_img

Politics News: संगमनेर, निळवंडे कालव्यांचे पाणी आल्याने अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होत आहे. पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुयोग्य नियोजनामुळे पाण्याचा थेट लाभ शेतीक्षेत्राला होणार असल्याने गावाचे अर्थकारण प्रगतीच्या दिशेने जाईल, असा विश्वास डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

तालुक्यातील निमगावजाळी आणि आश्वी येथे निळवंडे उजव्या कालव्यातून उपलब्ध झालेल्या पाण्यामुळे गावातील बंधारे व तलाव भरल्याने परीसरातील शेतकार्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यानिमित्त आयोजित जलपूजन कार्यक्रमात डॉ. विखे बोलत होते.

मागील अनेक वर्षांपासून निळवंडे धरणाच्या पाण्याची प्रतिक्षा या भागातील शेतकऱ्यांना होती. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मंत्री विखे पाटील यांच्या पुढाकाराने कालव्यांची कामे मार्गी लागली. २०२४ पर्यंत पाणी देण्याचा दिलेला शब्द पूर्ण होत असल्याचे समाधान सर्वांना आहे, असे डॉ. विखे म्हणाले.

कालव्याच्या पाण्याचा लाभ थेट शेतीक्षेत्राला होणार असल्याने उत्पादकता वाढण्यास मोठी मदत होईल. गावाचे अर्थकारण यामुळे बदलेल, असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक गावात विकासाची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. विकास कामांचा चढता आलेख शिर्डी मतदारसंघात कायम असून, रस्त्यांच्या कामांसह व्यक्तिगत लाभाच्या योजनांना लोकांपर्यंत पोहचविण्यात जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पुढाकार घेतला जात आहे.

राज्यातील महायुती सरकारने सुरू केलेल्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबरोबरच बचत गटातील महिलांच्या उत्कर्षासाठी विखे पाटील यांच्या पुढाकाराने योजना राबविल्या जात आहेत. शिर्डी येथे सुरू होणाऱ्या औद्योगिक वसाहतीमुळे युवकांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

 

 

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी… नवाब मलिक यांना कोर्टाचा मोठा दणका… दाऊदच्या मालमत्ता प्रकरणात नेमकं काय घडलं?

मुंबई / नगर सह्याद्री - राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालय विशेष...

शहाजी बापू संतापले; ‘भाजपचे राजकारण हिडीस अन् अबलेवर बलात्कार केल्यासारखे..’ नेमकं काय म्हणाले?

मुंबई / नगर सह्याद्री - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्ष...

पालक, शिक्षकांना मोबाइलच्या तोट्यांची माहिती देणार : मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी

जिल्हा परिषद व ‘ऋणानुबंध’च्या संयुक्त विद्यमाने मोबाइलवर कार्यशाळा अहिल्यानगर | नगर सह्याद्री विद्यार्थ्यांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी...

आश्रमशाळेच्या नावाखाली २ कोटी ४८ लाखांचा डल्ला; नगरमधील प्रकार

सद्गुरू रोहिदासजी संस्थेच्या अध्यक्षासह सात पदाधिकार्‍यांवर फसवणुकीचा गुन्हा अहिल्यानगर | नगर सह्याद्री  केंद्र शासनाकडून आश्रमशाळेसाठी मिळालेल्या...