अहमदनगर | नगर सह्याद्री:-
भाजपचे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुजय विखे यांनी निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीच्या मागणीवर शिक्कामोर्तब झाला आहे.आक्षेप घेतलेल्या मतदान केंद्रावर मशीनची मेमरी रिकामी करून पुन्हा मतदान प्रक्रिया (मॉकपोल) राबवली जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही कार्यवाही होईल. सुजय विखे यांच्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीत काय निष्कर्ष येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीतील भाजपचे उमेदवार सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नीलेश लंके यांच्या लढत झाली. विद्यमान खासदार सुजय विखे यांचा या निवडणुकीत पराभव झाला. सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांना हा पराभव मान्य नाही. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विचारमंथन केल्यानंतर सुजय विखे यांनी निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी केली. ही मागणी मान्य होणार, की नाही याकडे लक्ष लागले होते. दरम्यान भाजपचे सुजय विखे यांनी ४ जूनला मतमोजणी पार पडल्यानंतर १० जूनला मतदारसंघातील ४० मतदान केंद्रावरील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनची पडताळणी करण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडे अर्ज केला होता.
जिल्हा प्रशासनाने हा अर्ज राज्य निवडणूक आयोगाकडे आणि तेथून पुढे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला. केंद्रीय निवडणूक आयोगाने या अर्जाची दखल घेत जिल्हा निवडणूक शाखेला मॉकपोल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रक्रियेसाठी सुजय विखे यांनी सुमारे १९ लाख रुपयांचे शुल्क निवडणूक आयोगाकडे भरले आहे.
अशी होणार तपासणी
आक्षेप घेण्यात आलेल्या ४० ईव्हीएम मशिनची मेमरी रिकामी करणार एका मशिनमध्ये प्रत्येकी १ ते १४०० मते टाकता येणार किती मतं द्यायची हे ठरवण्याचे अधिकार उमेदवारांना असणार आहे. व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएममशिनवरील मतांची पडताळणी होणारही संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली पार पडणार.