संजीव भोर, संतोष वाडेकर आदींचा आरोपींमध्ये समावेश
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगरमधील प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी आरोपींना १७ वर्षांनंतर शिक्षा सुनाविण्यात आली आहे. सध्या शिवसेनेचे (शिंदे गट) प्रवक्ते असलेले संजीव बबनराव भोर यांच्यासह १७ जणांना एक वर्षाची साधी कैद आणि ११ हजारांचा दंड अशी शिक्षा देण्यात आली आहे.
जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. सहारे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला आहे. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अर्जुन पवार, केदार केसकर यांनी काम पाहिले आहे. भोर (रा. पाईपलाईन रोड, अहिल्यानगर) यांच्यासह महादेव परशुराम भगत (रा. कापूरवाडी), बलभीम परशुराम भगत (रा. कापूरवाडी), बाबासाहेब बाबुराव जरे (रा. इमामपूर), संतोष विठ्ठल वाडेकर (रा. देसवडे, ता. पारनेर), आदिनाथ शंकरराव काळे (रा. वांजोळी, ता. नेवासा), रमेश अशोक बाबर (रा. बुरुडगाव रोड, अहिल्यानगर), आरोपी मयत किशोर सुनील आर्डे), अरुण बाबासाहेब ससे (रा. जेऊर), संदीप शंकर पवार (रा. एम.आय.डी.सी), शरद गंगाधर (रा. एम.आय.डी.सी), कैलास शिवाजी पठारे (रा. जेऊर), योगेश गोविंद आर्डे (रा. मल्हार नगर, एम.आय.डी.सी), गणेश जितेंद्र शिंदे (रा. एम.आय.डी. सी), विठ्ठल उमेश गुडेकर (रा.एम.आय.डी.सी), बापू बाबासाहेब विरकर (रा.एम.आय.डी.सी), सागर कडुबा घाणे (रा. नवनागापूर) असे शिक्षा झालेल्या आरोपींचे नावे आहेत.