अहिल्यानगर | नगर सह्याद्री
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आवारात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धाकृती पुतळा लवकरात लवकर बसविण्यात यावा, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसून त्या चौकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या नावाचे फलक मनपाच्या वतीने बसवण्यात यावेत, तसेच पूर्ण कृती पुतळ्याच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायापाशी जाण्याकरता पायर्या बसवण्यात यावे तसेच शुशोभिकरणातील लॉन खराब झालेले असल्याने लॉनचे काम नव्याने करण्यात यावे व सुरक्षिततेच्या तसेच स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून २४ तास महापालिकेच्या कर्मचारी वर्ग नेमण्यात यावा अशी मागणी समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने मनपा आयुक्तांना निवेदन देऊन या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सुरेश बनसोडे, सुमेध गायकवाड, किरण दाभाडे, विशाल भिंगारदिवे, किरण गायकवाड, संतोष पाडळे, रवींद्र कांबळे, संजय खामकर, मयूर बांगरे, सुभाष वाघमारे, अजय पाखरे, अंकुश मोहिते, कौशल गायकवाड, सचिन जगधने, येशुदास वाघमारे, रवींद्र कांबळे, सिद्धांत गायकवाड, अंबादास अरुण, आदेश बचाटे, सुरेश वैरागर, सतीश साळवे, समीर भिंगारदिवे, पप्पू पाटील, वैभव आवटी, ऋषी कसबे, सागर ठोकळ, सचिन शेलार, नितीन खंदारे, संजय खामकर, अरुण गाडेकर, अशोक नन्नवरे, युवराज शिंदे, विवेक विधाते, सुमित भिंगारदिवे, महेश सातपुते, राजू पाटोळे, राहुल शिवशरण, दीपक सरोदे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.
मार्केट यार्ड चौकाला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असे नाव देण्यात आले आहे. परंतु त्या चौकात संबंधित नावाचे अॅक्रीलिक फलक अद्याप बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ते फलक त्वरित लावण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली.आंबेडकरी समाजाचे पदाधिकारी, भीमसैनिक आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी या निवेदनावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



 
                                    
