उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार संग्राम जगताप व आयुक्त यशवंत डांगे यांची प्रमुख उपस्थिती
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
अहिल्यानगर महानगरपालिका व आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून, त्याचे अनावरण रविवार, दिनांक २७ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता करण्यात येणार आहे.
या ऐतिहासिक सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार संग्राम जगताप, तसेच महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी अहिल्यानगर शहरासह परिसरातील सर्व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून, या कार्यक्रमाला विशेष सामाजिक व ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
पुतळ्याभोवती करण्यात आलेल्या सुशोभीकरणाची कामे पूर्ण झाली असून, संपूर्ण परिसराला नवा सांस्कृतिक आणि प्रेरणादायी स्वरूप देण्यात आले आहे. कार्यक्रमाची अधिकृत रूपरेषा आणि आयोजने संबंधित सर्व माहिती शनिवार, दिनांक १९ जुलै रोजी पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात येणार आहे.
दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीने विनंती केली आहे की, या लोकार्पण सोहळ्याशी संबंधित कोणत्याही प्रकारची चर्चा केवळ अधिकृत समितीच्या माध्यमातूनच व्हावी. इतर कुणाही व्यक्ती अथवा संस्थेला स्वतंत्ररित्या निवेदन देऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
27 जुलैला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे अनावरण : आयुक्त यशवंत डांगे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शहर व जवळपासच्या गावातील सर्व भीमसैनिक आंबेडकरी जनतेची मीटिंग महानगरपालिकेमध्ये संपन्न झाली. यावेळी आयुक्तांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंबेडकरी जनतेला संबोधित करताना आयुक्त म्हणाले सर्व जनतेच्या मागणीनुसार 27 जुलैला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे अनावरण होईल.