spot_img
अहमदनगरडॉ. अनिल बोरगे यांचे आयुक्तांना पत्र, म्हणाले चुकीचा अर्थ लावून...

डॉ. अनिल बोरगे यांचे आयुक्तांना पत्र, म्हणाले चुकीचा अर्थ लावून…

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जिल्हा व महानगरपालिका स्तरावर महत्वाच्या आरोग्य निर्देशांकानुसार मासिक रँकिंग दिले जाते. हे रँकिंग म्हणजे स्पर्धा नसून सदर निर्देशांकानुसार आरोग्य सेवांच्या अद्ययावत परिस्थितीचे महापालिकांना आकलन व्हावे यासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकार्‍यांना रँकिंग दिले जाते. ही सर्व प्रक्रिया थेट शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग स्तरावर होते. यात रँकिग घसरल्याने संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करावी असे कुठेही नमूद नाही. तरीही या प्रकरणी शासकीय पत्रकाचा चुकीचा अर्थ लावून माझ्यावर केलेली सक्तीच्या रजेवर जाण्याची कारवाई मागे घेऊन पुन्हा कामकाज करण्यास तात्काळ परवानगी द्यावी, असे पत्र वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.्अनिल बोरगे यांनी मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना दिले आहे.

या पत्राच्या प्रती नगरविकास खात्याचे प्रधान सचिव, आरोग्य सेवा संचालक तसेच राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाचे अतिरिक्त संचालक यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.
रँकिंग बाबत प्राप्त झालेल्या पत्रांचा चुकीचा अर्थ काढून मला सक्तीच्या रजेवर पाठविलेले आहे. मी दिनांक ८ जानेवारी २०२५ रोजी पुणे येथे संचालक, राज्य कुटूंब कल्याण कार्यालयात उपस्थित होतो. तेथे संबंधित अधिकारी यांना मी झाल्या प्रकाराबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे व अहिल्यानगर महानगरपालिकेचे वैद्यकिय आरोग्य अधिकारी यांचे रँकिंग झालेल्या कामाच्या अनुषंगाने चुकीचे असल्याबाबत निदर्शनास आणून दिलेले आहे.

त्या संदर्भात सदरचे कामकाज पाहणारे अहिल्यानगर महानगरपालिकेचे कै.बाळासाहेब देशपांडे दवाखाना येथील वैद्यकिय अधिकारी, नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी, नर्सेस यांना वेळोवेळी दिलेल्या सूचना, ज्ञापन व त्यांचे खुलासे या संदर्भात सुध्दा चर्चा झालेली आहे. त्यानुसार निश्चितपणे त्याची नोंद घेवुन अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वैद्यकिय आरोग्य अधिकारी यांचे रँकिंग सुधारणार आहे. सदरच्या रँकिंगचा मूळ उद्देश लक्षात न घेता चुकीचा अर्थ काढून माझ्यावर सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश निर्गमित झालेले आहेत. माझ्यावर चुकीच्या पध्दतीने सक्तीच्या रजेवर जाण्याचा झालेला आदेश मागे घ्यावा, असे डॉ. बोरगे यांनी पत्रात म्हटले आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्रीगोंद्यात गुन्हेगारीचा कहर! महिलेच्या डोक्याला लावली पिस्तुल, पुढे घडलं असं काही..

श्रीगोंदा | नगर सह्याद्री तालुक्यातील वडाची वाडी येथे कोर्टातील दाव्याच्या कारणावरून एका महिलेस पिस्तुलाचा...

नगरमध्ये चाललंय काय? दोन दिवसात ‘इतक्या’ अल्पवयीन मुला-मुलीचे अपहरण

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दोन दिवसांच्या कालावधीत दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अल्पवयीन मुलीसह मुलाचे अपहरण केल्याच्या...

गोदावरीला पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला, पहा कुठे काय परस्थिती?

नाशिक । नगर सहयाद्री :- नाशिक जिल्ह्याला पावसाने झोडपले असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण...

नगर अर्बन बँक प्रकरण: ठेवीदारांसाठी महत्वाची अपडेट; ठेवी परत मिळणार?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अवसायानात निघालेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांची प्रतिक्षा अखेर संपली असून...