अहमदनगर। नगर सह्याद्री 
हरातील डीपी रस्ते पूर्वी फक्त नकाशावरती दिसत होते. मात्र मी ते रस्ते प्रत्यक्षात उतरून दळणवळणासाठी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे उपनगरांच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे. स्थायी समिती माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या कामाच्या माध्यमातून बोल्हेगाव – नागापूर भागाला वेगळी ओळख निर्माण झाली आहे असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
बोल्हेगाव संभाजीनगर येथे स्थायी समितीचे मा. सभापती कुमार सिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून परमपरमेश्वर महादेव मंदिर येथील काँक्रिटीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार संग्राम जगताप बोलत होते. यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती कुमारसिंह वाकळे, राजेश कातोरे, अमोल लगड, साधना बोरुडे, वैशाली अंकुश, रजनी अमोद्कर, शामलाल तिवारी, शंकर कड, विलास जाधव, अक्षय दुधाळ, विजय खरात, गणेश भडके, अनिल शिंदे, ऋषी कराळे, महेश कराळे, अनिल अनप, मयूर भांबरे, अशोक सवरे, रोहिदास चकाले, शंकर शिंदे, वैभव फाळके आदी उपस्थित होते.
आ. जगताप म्हणाले, विकासाच्या कामा एवढेच धार्मिकतेला तितकेच महत्त्व आहे. महाराष्ट्राला लाभलेली संत महंतांची परंपरा अखंडित पणे सुरू राहण्यासाठी आजच्या युवकांना अध्यात्मिकतेचे धडे दिले जाणे गरजेचे आहे. या माध्यमातून त्यांना चांगल्या कामाची प्रेरणा मिळत असते असे ते म्हणाले.
कुमारसिंह वाकळे म्हणाले की, बोल्हेगाव – नागापूर परिसराच्या सर्वांगीण विकासाचे काम सुरू आहे. नागरिकांना विश्वासात घेऊन काम केले असल्यामुळेच विकास कामातून ऋणानुबंध निर्माण झाले आहेत. आ.संग्राम जगताप यांच्या माध्यमातूनच जनतेचे प्रश्न सोडवले जात असल्याचे ते म्हणाले.


                                    
