spot_img
अहमदनगरसुजय विखे यांचा ईव्हीएमवर संशय? चौकशीसाठी निवडणूक आयोगाला केला अर्ज

सुजय विखे यांचा ईव्हीएमवर संशय? चौकशीसाठी निवडणूक आयोगाला केला अर्ज

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
भाजपाचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप नोंदवला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुजय विखे यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची चौकशी करण्याची मागणी केली आहे, त्यासंबंधीचा अर्ज देखील निवडणूक आयोगाकडे सादर केल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकांने दिली आहे. नुकत्याच देशामध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या. ४ जूनला या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. देशातील लोकसभा निवडणूकीचा एकंदरीत कल पाहता. यात महाराष्ट्राची लोकसभा निवडणूक हे संपूर्ण देशामध्ये वेगळी ठरली. केंद्रामध्ये जरी एनडीएचे सरकार स्थापन झाले. मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मोठी ताकद दाखवून दिली.

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा संपूर्ण राज्यामध्ये लक्ष वेधून घेणारा ठरला. नगर जिल्ह्यातील बडे राजकीय प्रस्थ म्हणून समजले जाणारे विखे कुटुंबातून डॉ. सुजय विखे आणि महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांचे उमेदवार निलेश लंके यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत झाली.

या निवडणूकीत निलेश लंके यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांचा तब्बल २९ हजार ३१७ मतांनी पराभव केला. परंतु आता या झालेल्या पराभवानंतर मात्र डॉ.सुजय विखे पाटील यांनी मात्र ईव्हीएम मशीनवर आक्षेप नोंदवला आहे. आता सुजय विखे यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यासंबंधीचा अर्ज देखील निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. असे वृत्त एका इंग्रजी दैनिकांने दिले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे अर्ज केलेला आहे. यात जवळपास १० उमेदवारांचा जवळपास समावेश आहे. या सगळ्या नेत्यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनची चौकशीची मागणी केलेली आहे.

इंग्रजी दैनिकांने दिलेल्या वृत्तानुसार चौकशी करण्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे एकूण दहा अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. यातील बहुतेक उमेदवारांनी एक ते तीन ईव्हीएम युनिटची पडताळणी करावी, अशी मागणी केलेली आहे. परंतु काहींनी मात्र यापेक्षा जास्त युनिटची चौकशी करावी, अशा पद्धतीचे मागणी केलेली आहे. विशेष म्हणजे या प्रकारची चौकशी करण्यासाठी प्रत्येक ईव्हीएम मशीन करिता ४० हजार रुपये आणि त्यावर १८% जीएसटी भरावा लागणार आहे. सुजय विखे पाटील यांनी मात्र विधानसभा मतदारसंघ निहाय ईव्हीएम मशीन चौकशी करण्याची मागणी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Ahmednagar Crime: १० तोळ्यांच्या दागिन्यांसह मेकॅनिक रेहान अडकला जाळ्यात; अल्पवयीन मुलीसोबत केलेला प्रकार भोवला?

Ahmednagar Crime: सोशल मीडियावर केलेली चॅटींग व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने अल्पवयीन मुलीकडून सुमारे...

Ahmednagar News: आमदार ‘आरोपी’ चे ‘बॉस? काही तर बिल्ला लाऊनच फिरतात; भाजप नेत्याने थेट अजित पवार गटाच्या आमदारावर निशाणा साधला

Ahmednagar News: अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती....

Ahmednagar News: नगर जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकूळ! दोन तरुणांवर भल्या पहाटे हल्ला?

अहमदनगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात...

कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करा, अन्यथा… आज कुणाच्या राशीत काय?

मुंबई। नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य कदाचित आपणास अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे आपले संतुलन...