spot_img
अहमदनगरशिर्डीत दुहरी हत्याकांड! दरोडेखोरांनी बाप-लेकाला संपवल

शिर्डीत दुहरी हत्याकांड! दरोडेखोरांनी बाप-लेकाला संपवल

spot_img

Ahilyanagar Crime News: एकीकडे शिर्डीत रामनवमीच्या उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे शिर्डीत दोघांची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. शिड विमानतळाजवळील काकडी शिवारातील गुंजाळवस्तीवर ही घटना घडली आहे. दरोड्याच्या उद्देशाने हल्ला करत हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मृतात वडील व मुलाचा समावेश आहे तर आई गंभीर जखमी झाली आहे. साहेबराव भोसले (60) व कृष्णा भोसले (30) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिड विमानतळाजवळील काकडी शिवारातील गुंजाळवस्ती येथे दोघांची निर्घृण हत्या तर एक जण गंभीर जखमी आहे. दरोड्याच्या उद्देशाने हल्ला करत हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. घरातील सामानाची उचकापाचक झाल्याचे देखील समजते. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, दोघांच्या हत्येमुळेशिर्डीत एकच खळबळ उडाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खडीमाफिया दत्तात्रय शेळके म्हणतो, कलेक्टर अन्‌‍ पोलीस माझ्या खिशात!

अकोले तहसीलदारांनी वहिवाट रस्ता मंजूर केला, बेलापूरच्या खडी क्रशरवाल्याने उखडून टाकला! 10 लाख खर्चून तयार...

‘सिस्पे’, साकळाई योजनेबद्दल विखे पाटलांचे मोठे विधान, जनतेच्या पैशाची जबाबदारी ‘त्या’ लोकप्रतिनिधीची

पद्मश्रींच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांना सन्मान; शेतकरी दिनाच्या घोषणेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे डॉ. सुजय विखे...

आझाद ठुबे यांच्या राजे शिवाजी पतसंस्थेत 67 कोटींचा घोटाळा

अपहाराशी संबंधित 40 घोटाळेबहाद्दरांसह सहा कर्मचारी दोषी पारनेर | नगर सह्याद्री माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद...

गणेश मंडळांना मिळणार एका क्लिकवर परवानगी; आयुक्त डांगे यांनी दिली माहिती, पहा लिंक..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री गणेशोत्सवात व इतर सण-उत्सव काळात मंडप उभारणी, स्वागत कमानी, रनिंग मंडपसाठी...