spot_img
ब्रेकिंगदुहेरी हत्याकांड! आजीच्या डोक्यात कुकर घातला, आजोबांना विहिरीत फेकलं; कुठे घडली भयंकर...

दुहेरी हत्याकांड! आजीच्या डोक्यात कुकर घातला, आजोबांना विहिरीत फेकलं; कुठे घडली भयंकर घटना..

spot_img

Maharashtra Crime News: लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील गरसुळी गावात एक खळबळजनक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने शेतातील घरात राहणाऱ्या वयोवृद्ध नवरा-बायकोची निर्घृण हत्या करून घरातील सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी उघडकीस आली असून अवघ्या 12 तासांत लातूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा गावातीलच असल्याचे समोर आले आहे.

पुष्पलता रावसाहेब कातळे (वय 52) यांना आरोपीने प्रथम डोक्यात कुकर फेकून मारले, त्यानंतर दगडाने ठेचून हत्या केली. त्यांच्या पतीला–रावसाहेब मुकुंद कातळे (वय 60) – अर्धांगवायूचा झटका आलेला असल्याने ते हालचाल करू शकत नव्हते. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने त्यांना घराजवळील विहिरीत फेकून दिले. या क्रूर कृत्यात दोघांचा मृत्यू झाला.

चोरट्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने व कानातले लंपास केले. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि स्थानिक गुन्हे शाखेने केवळ 12 तासांत आरोपी पंडित रावणकोळे याला अटक केली. तपासात हे स्पष्ट झाले की त्याने केवळ चोरीच्या उद्देशाने हे क्रौर्य केले होते. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ओला, उबेर बंद!

Taxi Ban:- कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्सना...

रामदेव बाबांचा धक्कादायक दावा; विमान दुर्घटनेत ‘या’ देशाचा हात?

Ramdev Baba: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, योगगुरू रामदेव...