मुंबई । नगर सहयाद्री:-
लाडकी बहीण योजनेत आता महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र येणार आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यात 3000 रुपये एकत्र जमा होणार आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना 1500 रुपये दिले जात आहेत. या योजनेत फेब्रुवारी महिना संपला तरीही अद्याप महिन्याचे पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये निराशा झाली आहे. दरम्यान, आता दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र येणार आहे.
लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारीचे 1500 रुपये आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये एकत्र दिले जाणार आहे. दरम्यान, मार्च महिन्यात महिलांना 2100 रुपये देणार असल्याची चर्चा होत आहे. अर्थसंकल्पानंतर महिलांसाठी 2100 रुपये होण्याची घोषणा आहे. मात्र, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आता पुढच्या महिन्यात एकूण किती पैसे मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागले आहे.
लाडकी बहीण योजनेत अर्जांच्या पडताळणीनंतरच महिलांना पैसे देणार असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, ही पडताळणी 5 टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. त्यातील काही अर्जांची पडताळणी झालेली आहे. यातून आतापर्यंत 9 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. एकूण 50 लाख महिलांचे अर्ज बाद करण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही. यामागे दोन कारणे असू शकतात. एक म्हणजे महिलांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झालेली नाही. आणि दुसरं कारण म्हणजे काही तांत्रिक अडचणींमुळे पैसे जमा न झाल्याचे सांगण्यात येत आहे.