spot_img
अहमदनगरलाडक्या बहि‍णींना डबल खुशखबर! ८ तारखेला ३००० मिळणार?

लाडक्या बहि‍णींना डबल खुशखबर! ८ तारखेला ३००० मिळणार?

spot_img

Ladki Bahin Yojana:लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता लवकरच दिला जाणार आहे. लाडक्या बहि‍णींना महिला दिनी म्हणजेच ८ मार्च रोजी महिलांना ३००० रुपये मिळणार आहे, अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली आहे.

लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी दिली आहे. लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र देण्यात येणार आहे. आदिती तटकरेंनी विधानसभेबाहेर ही मोठी घोषणा केली आहे.

लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता दिला नव्हता. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी होती. मात्र, आता मार्च महिन्याचाही हप्ता एकत्र देण्यात येणार आहे . त्यामुळे महिलांना ८ मार्च रोजी ३००० रुपये मिळणार आहे. महिला दिनाचा मूहूर्त साधून महिलांना ३००० रुपये दिले जाणार असल्याची घोषणा आदिती तटकरेंनी केली आहे.

महायुती सरकार सक्षम
८ मार्च रोजी महिला दिनानिमित्त विशेष सत्र होणार आहे. महिला सभापतींसाठी हे विशेष सत्र आयोजित केले जाणार आहे. त्याचसोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ८ मार्चच्या पूर्वसंध्येला महिलांना देण्यात येईल. ५-७ तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यामुळे महिलांना ८ मार्च रोजी हे पैसे दिले जाणार आहे. अडीच कोटी महिलांना हा हप्ता मिळणार आहे. मागच्या महिन्यात २ कोटी ३५ लाख महिलांना पैसे मिळाले आहेत. या महिन्यातही अडीच लाख महिलांना हप्ता मिळणार आहे. महायुतीचं सरकार सक्षम आहे. आम्ही लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने पुढे सक्षमरित्या कार्यरत ठेवणार आहे. फेब्रुवारीचा हप्ता ८ तारखेला येणार आहे. तर मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीत कधीही येऊ शकतो. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या हप्त्याची प्रक्रिया सुरु होईल, असंही त्यांनी सांगितलं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सणाला गालबोट! दोन गटात राडा; वाद सोडवणे पोलिसाला भोवले

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - बिहारच्या मुंगेरमध्ये दोन गटाचा वाद सोडवायला गेलेल्या सहायक पोलीस...

१ एप्रिलपासून FASTag अनिवार्य; अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार, काय आहेत नियम

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्र शासनाने फास्टॅगसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.आता १ एप्रिलपासून प्रत्येक...

कृषिमंत्री कोकाटे यांच्या अडचणीत वाढ! हायकोर्टात याचिका..

Manikrao Kokate: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोकाटे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात...

शिवसेना खंबीरपणे गोरक्षकांच्या पाठीशी: काळे

माजी मंत्री अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त सावेडीतील सतनाम साक्षी गोशाळेत चारावाटप अहिल्यानगर । नगर...