मुंबई। नगर सह्याद्री-
एप्रिल महिन्यांच्या सुरवातीपासुनच राज्यातील हवामानमध्ये मोठे बदल पहावयास मिळत आहे. एकीकडे गेल्या चार दिवसापासूनत अवकाळी पावसाने अनेक जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे तर दुसरीकडे पुन्हा उन्हाचा चटका वाढू लागला आहे. दरम्यान हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील मालेगाव शहराची देशातील उच्चांकी म्हणजेच ४१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आसुन राज्यावर अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय.पुढील २४ तासांत सोलापूर, बीड, लातूर, उस्मानाबाद या भागात अवकाळी पावसाची शक्यता कायम आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.