मुंबई। नगर सहयाद्री
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडतांना दिसत आहे. त्यातच महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अशात आता निकालाची प्रतिक्षा केली जात असून महाराष्ट्रात काय होणार? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. अशात राज्यात विविध घडामोडी घडत आहेत. ऐन निवडणूक काळात शरद पवारांना दुहेरी धक्का बसण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा आणि युवती राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहन या पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याचं समोर आलं आहे. धीरज शर्मा आणि सोनिया दुहन या अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
धीरज शर्मा हे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. पण त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये राष्ट्रवादी पक्षातील सगळ्या पदांचा राजीनामा दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच सोनिया दुहन शरद पवारांच्या विश्वासू म्हणून ओळखल्या जातात. तसेच युवती संघटनेचं राष्ट्रीय नेतृत्व आणी प्रवक्ते म्हणूनही त्यांनी पक्षासाठी काम केले आहे. हे दोघेही अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.