spot_img
ब्रेकिंगएसईबीसी, ईडब्लूएस, ओपन आरक्षण नको का?; मंत्री छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले...

एसईबीसी, ईडब्लूएस, ओपन आरक्षण नको का?; मंत्री छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले पहा

spot_img

मराठा समाजाला सवाल | नेत्यांनाही धरले धारेवर
नाशिक | नगर सह्याद्री

राज्यातील मराठा समाजाला आतापर्यंत त्यांच्यासाठी लागू असलेले कोणतेही आरक्षण नको, फक्त ओबीसीतूनच आरक्षण हवे का, हे राज्यातील मराठा नेत्यांनी आणि मंत्र्यांनी स्पष्ट करावे, असा सवाल मंत्री छगन भुजबळ यांनी समाजाला विचारला आहे. ओबीसी आरक्षण हवे असल्यास तुम्हाला इतर सवलती आणि आरक्षण नको का? असा सवालही भुजबळांनी विचारला आहे.

मराठा समाज यापूर्वी खुल्या प्रवर्गातील ५० टक्क्यांमध्ये येत होता. मग पंतप्रधान मोदींनी १० टक्के आरक्षण दिले. आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिक मागास आहेत पण सामाजिक मागास नाहीत, अशांसाठी हे १० टक्के आरक्षण होते. त्यामध्ये एकटा मराठा समाज ८० टक्के होता. यानंतर राज्यात मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण देण्यात आले. तरीसुद्धा आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन होत आहे. त्यामुळे मला मराठा समाजाला एक प्रश्न विचारायचा आहे की, तुम्हाला १० टक्के ईडब्लूएस, राज्य सरकारने दिलेले १० टक्के आरक्षण आणि खुल्या प्रवर्गाचे आरक्षण नको का? तुम्हाला यापैकी कोणतेही मराठा आरक्षण नको का? मग हे आरक्षण रद्द करायचे का? ईडब्लूएस आरक्षणात मराठा समाजाला वाटा ८० ते ९० टक्के इतका आहे.

खुल्या प्रवर्गातही ५० टक्के मराठा समाज आहे. हे सगळे आरक्षण सोडून तुम्हाला फक्त ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण हवे आहे का, असा सवाल छगन भुजबळ यांनी विचारला.सुशिक्षित मराठे आहेत, जे मुख्यमंत्री, आमदार, खासदार झालेत ज्यांना आरक्षण काय कळतंय, त्यांना विनंती करतोय. आर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास मात्र सामाजिक दृष्ट्या मागास नाही अशांना १० टक्के आरक्षण दिलं. त्यात ८० टक्के मराठा समाज आहे. पुन्हा मराठा समाजाकडून आरक्षणाची मागणी होतेय. मराठा समाजाला ओबीसीमध्ये घ्या अशी आंदोलनं होत आहेत. तुम्हाला १० टक्क्यांचे आरक्षण नको का? असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.

मराठा समाजापाठोपाठ आता ओबीसी समाजाचाही मुंबईत मोर्चा
मराठा समाजापाठोपाठ आता ओबीसींचा मोर्चाही मुंबईत धडकण्याची शक्यता आहे.  सरकारने काढलेल्या जीआरमुळे मराठा समाजातील अनेक व्यक्तींना कुणबी दाखले मिळून त्यांचे ओबीसीकरण होण्याची भीती ओबीसीतील इतर जातींना आहे. या पार्श्वभूमीवर सरकार दरबारी आपला रोष व्यक्त करण्यासाठी आम्हीही मुंबईत लाखोंच्या संख्येने धडक देऊ, असं ओबीसी नेत्यांकडून सांगितलं जात आहे. साधारण ८ किंवा ९ ऑटोबरला मुंबईत ओबीसी मोर्चाचं आयोजन केलं जाणार असल्याचे समजते. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी लाखो आंदोलकांसह मुंबईत उपोषण करत सरकारला झुकण्यास भाग पाडलं आणि आपल्या मागण्या मान्य केल्या. मात्र या शासन निर्णयामुळे अस्वस्थ झाल्यामुळे ओबीसींकडूनही मुंबईत मोर्चाचं आयोजन केलं जाणार असल्याने सरकारची कोंडी होण्याची शयता आहे.

मराठा समाजातील नेत्यांनी उत्तर द्यावे ः मंत्री छगन भुजबळ
राज्यातील मराठा समाजातील नेत्यांनाही भुजबळांनी सवाल केले आहेत. अनेक माजी मराठा मुख्यमंत्री, मराठा समाजाचे केंद्रातील नेते, खासदार आणि आमदार जे शिकलेले आहेत आणि ज्यांना आरक्षणाच्या मुद्द्याची समज आहे, त्यांच्याकडून मला  उत्तर हवे आहे. जे अशिक्षित आहेत, त्यांच्याकडून मला उत्तराची अपेक्षा नाही. मराठा नेत्यांनी याबाबत व्होकल झालं पाहिजे, असंही मंत्री छगन भुजबळ यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहमदनगर नव्हे आता अहिल्यानगर रेल्वेस्थानक, रेल्वेस्टेशनचेही नाव बदलले, सरकारकडून प्रक्रिया पूर्ण

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : अहिल्यानगरचे नामांतर केल्यानंतर आता रेल्वेस्थानकाच्या नामांतराचीही प्रक्रिया पूर्ण झाली आहे....

तयारीला लागा! जिल्हा परिषद अध्यक्ष पदांच्या आरक्षणाचा फुगा फुटला, अनेक दिग्गजांना मोठा धक्का, कुठे काय निघाले आरक्षण पहा

अहिल्यानगर झेडपीचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव / जिल्ह्यातील दिग्गजांना मोठा धक्का | राज्यातील...

धक्कादायक! हायकोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी, दिल्ली, मुंबईत खळबळ

नवी दिल्ली | वृत्तसंस्था दिल्लीतील नामांकित शाळा बॉम्बस्फोट करून उडवून देण्याची धमकी ताजी असतानाच आता...

नगरमध्ये ट्रक चालकांकडून अवैध वसुली; ‘तो’ पोलीस अडकला, एसपींनी काढले असे आदेश

एमआयडीसी पोलीस ठाण्यातील अंमलदार निलंबित अहिल्यानगर | नगर सह्याद्री शेंडी बायपास परिसरात ट्रक चालकांकडून अवैधरीत्या पैसे...